आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हिमवादळ 5 ठार, 1900 उड्डाणे रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टिन- अमेरिकेच्या दक्षिण पश्चिम भागाला शुक्रवारी हिमवादळाचा जबर तडाखा बसला. रस्त्यावर बर्फाचे ढिगारेच्या ढिगारे असून वाहतूक कोलमडली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने लाखो लोक अंधारात आहेत. खराब हवामानामुळे विमानांची 1900 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खबरदारी घेऊनही वादळाने 5 बळी घेतले आहेत.
शुक्रवारी आलेल्या हिमवादळाचा सर्वाधिक फटका टेक्सास आणि अर्कान्सास राज्याला बसला आहे. अर्कान्सासचे गव्हर्नर माइक बीब यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. डलास व परिसरातील शहरांमध्ये तापमानात शून्य ते उणे 40 डिग्री सेल्सियस एवढी प्रचंड घसरण झाली आहे. मिसौरीसह काही भागात आठ इंचांपर्यंत बर्फ पडला आहे.
पुढील चोवीस तासांतही प्रचंड बर्फवृष्टी, पाऊस अणि वादळाचे भाकीत अमेरिकेच्या हवामान खात्याने वर्तवलेआहे. त्यामुळे नॅशविले शहरातील शनिवारी होणारे ख्रिसमस संचलन आणि सेंट जूड मेंफिस मॅरेथॉन रद्द करावी लागली आहे. रविवारी आयोजित डलास मॅरेथॉन व इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. डलास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर झालेल्या अपघातात एका जण मृत्युमुखी पडला. सॅनफ्रान्सिस्को येथे चार लोकांना अति थंडीमुळे हायपोथर्मियाची लागण झाली आहे. लाखो लोकांना कामधाम सोडून घरातच बसावे लागले आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या भागात दूध व खाण्यापिण्याच्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे.उड्डाणपूल बंद करावे लागले असून वीज गायब झाल्याने सुमारे चार हजार प्रवाशांना रात्रभर विमानतळावरच मुक्काम करावा लागला.