आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Afzal Guru A Martyr, Who Is Hanumanthappa, Asks Yogeshwar Dutt

अफझलला शहीद संबोधल्याने भडकला पैलवान, म्हणाला- हनुमंतप्पाला काय म्हणाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणाबाजीवरून देशात रान पेटले आहे. त्यात ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त याने 'फेसबूक'वर देशभक्ती शिकवणारी एक कविता पोस्ट करून देशविरोधी घोषणा देणार्‍यांना चपराक लगावली आहे.

दहशतवादी अफझल गुरुला शहीद संबोधल्याविरोधात योगेश्वर दत्तने आवाज उठवला आहे. 'अफझलला शहीद संबोधले तर सियाचिनमध्ये हुतात्मा झालेल्या हनुमंतप्पाला काय म्हणाल? असा सवालही दत्तने उपस्थित केला आहे. दत्तची फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आतापर्यंत तिला 58, 329 लाइक मिळाल्या आहे. इतकेच नव्हे दत्तची पोस्ट 8, 261 यूजर्सनी ती शेअर केली आहे.

दरम्यान, संसदेवरील हल्ल्यातील शहीदांचे नातेवाईक उतरणार रस्त्यावर...
- संसदेवरील हल्ल्यातील शहीदांचे नातेवाईकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. शहिदांच्या नातेवाईकांनी सोमवारी ऑल इंडिया एंटी-टेरेरिझम फ्रंटचे अध्यक्ष एमएस बिट्टा याच्या नेतृत्त्वात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
- जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार्‍यांची मागणी केली आहे.
- सरकार दोषीवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा शहीदांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जेएनयू कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन करतील, असा इशारा बिट्टा यांनी दिला आहे.

दरम्यान, 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर झालेल्या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होता. अफजल गुरु हा हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. त्याला 2013 मध्ये फासावर लटकवण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, पैलवान योगेश्वर दत्त याची देशभक्ती शिकवणारी कविता...