आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Amir, Saif LoveTheir Waives, Then They Should Become Hindu Hindu Mahasabha

पत्नीवर प्रेम असल्यास आमिर, सैफने हिंदू व्हावे - हिंदू महासभेचे शाहरुख खानलाही आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या पत्नीशी तुम्ही खरेच प्रेम करत असाल, तर तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा, असे
आव्हान हिंदू महासभेने बॉलीवूड अभिनेते शाहरुख खान, आमिर खान आणि सैफ अली खान यांना दिले आहे. हिंदू सभा वार्ता या नियतकालिकातील संपादकीय लेखातून या तिन्ही दिग्गज अभिनेत्यांसोबतच फरदीन खान आणि इम्रान हाश्मी यांनाही हे आव्हान दिले आहे. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानने धर्माने हिंदू असलेल्या गौरी खानशी, आमिर खान याने किरण राव हिच्याशी, तर सैफ अली खान याने करिना कपूर हिच्याशी लग्न केले आहे.

हिंदू सभा वार्ताचे संपादक आणि प्रकाशक मुन्ना कुमार सिंग यांच्या मते, शर्मिला टागोर, करिना कपूर, गौरी छिब्बर, किरण राव आणि रिना दत्त या अभिनेत्री लव्ह जिहादच्या शिकार आहेत. त्यामुळे जर शाहरुख, आमिर आणि सैफ अली खानचे खरोखरच प्रेम असेल, तर त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचा स्वीकार करायला हवा.