आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Criminal Underground Because Of Bailout Then Action Will Take Supreme Court

जामिनावरील गुन्हेगार भूमिगत झाल्यास कारवाईचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखादा गुन्हेगार जामिनावर सुटून भूमिगत झाल्यास त्याचा जामीन घेणा-यावर कठोर कारवाई केली
जाईल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणीदरम्यान दिला. जामीन उल्लंघनाच्या घटना वाढल्याचे कोर्टाने म्हटले आहे.


न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर व विक्रमजित सेन म्हणाले की, जामिनावर मुक्त झाल्यानंतर गुन्हेगार बेपत्ता झाल्याच्या स्थितीत न्यायालयांनी गुन्हेगारी न्यायव्यवस्थेप्रति मूक दर्शकाची भूमिका बजावू नये. अशा प्रकरणांत कठोर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे.


सर्वोच्च न्यायालय म्हणाले, सुनावणीत गुन्हेगारासह त्याचा वकील गैरहजर असणे, अशी परिस्थिती रोजच ओढवणा-या अपिलीय न्यायालयांनी त्यांचा जामीन घेणा-यांविरुद्ध तत्काळ कारवाई करायला हवी. यामुळे बेपत्ता झालेले गुन्हेगार वठणीवर येऊन न्यायालयात हजर होतील. हा उद्योग करूनही बेपत्ता गुन्हेगार न्यायालयात हजर झाला नाहीच तर त्याने केलेले अपील फेटाळण्याचा अधिकार न्यायालयांना आहे.