आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहिष्णुता असती तर नागरिकत्व घेतले नसते, अदनान सामीचे उद‌्गार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात असहिष्णुता वाढत असल्याचा वाद सुरू असताना प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अदनान सामीने मात्र हा मुद्दा नाकारला आहे. सामी म्हणाला, असा एखादा मुद्दा असता तर मी भारताचे नागरिकत्व कशाला घेतले असते? सामीने याच वर्षी मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतात निवास करण्यासाठी अर्ज केला होता. भारतात प्रवास व्हिसावर आलेला सामी मार्च २००१ पासून भारतातच राहत आहे. ऑगस्टमध्ये त्याला भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली होती.