आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाआधीच तयार \'मोदी सरकार\'?, पहा कोणाला मिळू शकते कोणते मंत्रीपद...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या दोन टप्प्यातील मतदान अद्याप शिल्लक आहे. दिल्लीत कोणाचे आणि कसे सरकार स्थापन होणार, यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यापैकीच एक शक्यता म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होण्याची आहे. आजवर झालेल्या अनेक सर्व्हेक्षणांनीही यावेळी भाजपच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे आडाखे बांधले आहेत. लोकसभा निवडणुकांचा निकाल भलेही १६ मे रोजी लागणार असला, तरी सध्या सगळीकडे मोदींच्या संभाव्य मंत्रिपदाची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

आधीच सुरू झाली होती, मोदी सरकारची तयारी
- नरेंद्र मोदींनी आधीच एक थिंक टँक तयार केली आहे. त्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील काही प्रशासकीय अधिकार-यांचाही समावेश आहे.
- नव्या सरकारने काय करायला हवे? त्यांनी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रीत करायला हवे? याबाबत हे अधिकारी भाजपच्या नेत्यांना सल्ला देत आहेत.
- सरकारच्या कामात येणा-या समस्या दूर करणे हे या थिंक टँकचे प्रमुख काम आहे.
- यूपीएच्या सरकारच्या काळात सत्ता दोन ठिकाणी विभागली गेली होती. आपल्या कार्यकाळात तसे होऊ नये असे मोदींचे मत आहे.
- मोदींनी साऊथ ब्ल़ॉकमध्ये कामासाठी निश्चितच नवे वातावरण तयार केले आहे.
- नव्या भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेली वचने पूर्ण करण्यासाठी सरकारनंतर या अधिकार्यांना सर्वाधिक अधिकार दिले जाण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा - मोदी सरकारमध्ये होऊ शकणारे मोठे फेरबदल