आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If Passengers Cancel Tatkal, Premium Railway Ticket, They Get Half Fare Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तत्काळ, प्रीमियम रेल्वे तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना अर्धे भाडे मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तत्काळ आणि प्रीमियम रेल्वे तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना आता ५० टक्के भाडे परत मिळणार आहे. १ जुलैपासून या दोन्ही सुविधा देण्याची तयारी रेल्वे करत आहे. नव्या सुविधेसाठी १५ जूनपासून सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या प्रीमियम रेल्वेचे भाडे डायनॅमिक प्रणालीअंतर्गत आकारले जाते. म्हणजेच मागणी वाढली की भाडेही वाढते. या रेल्वेेचे तिकीट रद्दही होत नाही. १ जुलैपासून तिकीट रद्द झाल्यास ५० टक्के भाडे परत देण्यास सुरुवात होईल. भविष्यात ६० टक्के रक्कम परत देण्याची योजना आहे.