आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Rajiv Had Married Nigerian, Would Congress Have Accepted Her

सोनिया-राजीव गांधीच्या लग्नावर गिरीराज यांचे वक्तव्य, लग्नाचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री आणि बिहार भाजपचे वरिष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गाधींवर वर्णद्वेषी टिपण्णी केली आहे. त्यांच्यानुसार गोरा रंग असल्यामुळे सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्या.

बुधवारी हमीरपुरमध्ये एक पत्रकार परिषदेत गिरीराज सिंह यांनी हे वक्तव्य केले. गिरिराज म्हणाले की, 'राजीव गांधींनी एखाद्या दुसर्‍या (नायजेरियन) मुलीशी लग्न केले असते आणि ती काळी असती तर काँग्रेसने त्यांना स्वीकारले असते का?' गिरिराज यांनी राहुल गांधीवरही निशाणा साधला आणि त्यांना मलेशियाचे बेपत्ता विमान असे संबोधले.

सोनिया आणि राजीव गांधी यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, या दोघांची पहिले भेट 1965 मध्ये इंगलंडमधील एका रेस्तरॉंमध्ये झाली होती. त्यानंतर 1968 मध्ये राजीव गांधी यांनी हिंदू रिवाजाप्रमाणे सोनियांशी लग्न केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सोनिया-राजीव गांधी यांच्या लग्नाचे आणि इतर काही खास फोटो...