आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If The Bank Account Does Not Link To Aadhaar Then The Transactions Will Be Stopped

बँक खाते ‘आधार’शी लिंक न केल्‍यास व्यवहार रोखले जातील; अारबीआयचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बँक खात्यंाना आधारशी लिंक करण्याबाबत सुरू असलेला संभ्रम रिझर्व्ह बँकने दूर केला आहे. आरबीआयने शनिवारी स्पष्टीकरणात म्हटले आहे की, बायोमेट्रिक ओळख क्रमांक ‘आधार’ बँक खात्यांशी जोडणे सक्तीचे आहे. बँकांना निर्देशाची वाट न पाहता याची अंमलबजावणी करावी लागेल. प्रसारमाध्यमांच्या काही वृत्तानुसार आरटीआयच्या उत्तराचा हवाला देत म्हटले होते की, अारबीआयने याबाबत आतापर्यंत कोणतेही निर्देश जारी केले नाहीत.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की,  प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड््स), सेकंड अमेंडमेंट्स रुल्स २०१७, केंद्र सरकारने १ जून २०१७ रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले होते. त्याअंतर्गत आधार क्रमांकाला बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. हा नियम लागू झाला असल्यामुळे बँकांनी कोणाच्या निर्देशाची वाट न पाहता हा नियम लागू केला पाहिजे. 

३१ डिसेंबरपर्यंत लिंक गरजेचे 
जूनमध्ये केंद्राने अधिसूचना जारी करून बँक खाते उघडताना व ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी ‘आधार’ बँक खात्याशी जोडणे सक्तीचे केले होते. तसेच सध्याच्या खातेदारांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आपले खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. लिंक न केल्यास व्यवहार रोखले जाऊ शकतात. ही अधिसूचना प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (२००५) मध्ये दुरुस्तीसाठी जारी केली होती. याअंतर्गत ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी व्यक्ती, कंपन्यांसाठी आधारसोबत पॅन किंवा फॉर्म १६ देणे अनिवार्य केले होते. याआधी सरकारने आधार पॅनशी लिंक करणे सक्तीचे केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...