नवी दिल्ली- इतर मागासवर्गीय (अाेबीसी) श्रेणीतील क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा ६ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे. म्हणजेच सलग ३ वर्षांपर्यंत ८ लाख वा त्यापेक्षा जास्त एकूण वार्षिक उत्पन्न असल्यास संबंधित व्यक्ती किंवा त्यांची मुले क्रिमी लेअरच्या कक्षेत येतील. म्हणजेच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. केंद्राच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने बुधवारी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. सन १९९३ मध्ये क्रिमी लेअरची मर्यादा एक लाख रुपये होती. तेव्हापासून आजपर्यंत क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादेत चार वेळेस वाढ करण्यात आली आहे.