आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन चालवण्याचा परवाना आधारशी लिंक करणार; पावती फाडल्यास खात्यातून पैसे कटतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बँक खाते, पॅन व मोबाइल क्रमांकानंतर आता वाहन चालवण्याचा परवानाही आधार कार्डाशी लिंक करावा लागेल. केंद्र सरकार याच्या तयारीत आहे. बनावट लायसन्स नष्ट करणे व गुन्ह्यांना आळा घालणे हा त्यामागचा उद्देश आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासदंर्भात चर्चा केल्याचे रविशंकर यांनी डिजिटल हरियाणा परिषदेत सांगितले.

ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करण्यासाठी देशातील आरटीओ कार्यालयातील प्रणाली आधार प्रणालीशी जोडावी जाईल. हे काम वर्षभरात सुरू होईल. केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, एखाद्या व्यक्तीवर दंडाची आकारणी केल्यावर पैसे न दिल्यास त्याच्या खात्यातून थेट पैसे आरटीओकडे जमा होतील. त्याआधी दोन पावले उचलण्यास सांगितले जात आहे. प्रथम,संबंधित व्यक्तीला नियमाच्या उल्लंघनाचे छायाचित्र पाठवता यावे यासाठी सीसीटीव्ही असलेल्या रस्त्यांसाठी नोटीस असावी. दुसरे, सीसीटीव्ही नसेल तर सिग्नलवर उभ्या कर्मचाऱ्याने नियम मोडल्याचे छायाचित्र काढून पावतीसोबत जोडावे. परिवहन मंत्रालय व्यग्र महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याबाबत राज्यांशी चर्चा करत आहे. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी जोडण्याची प्रक्रियाही दोन टप्प्यात पूर्ण होईल. प्रथम, नवीन परवाने आधारशिवाय तयार होणार नाहीत. दुसरे, एका निश्चित मुदतीत जुने लायसन्स आधारशी लिंक केले जाईल.
 
अशा पद्धतीने पैसे कपात होतील
व्यक्तीच्या मोबाइलवर अकाउंटमधून पैसे कापण्याआधी संदेश येईल. आक्षेप असल्यास केंद्रीयकृत क्रमांक, वेबसाइटवर तक्रार देऊ शकतो. बँकेकडेही पावतीची सूचना जाईल. यानंतर बँक व्यक्तीस खात्यातून पैसे कापायचे की नाही याची विचारणा करेल.
 
आधार लिंकमुळे होणारे फायदे
- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास एका ठिकाणी गुन्हा केल्यास दुसऱ्या नावाने अनेक परवाने काढू शकणार नाही.
- अपघात झाल्यास अपघातग्रस्ताची ओळख पटवता येईल. एखाद्याने विमा काढला असेल तर त्याला तत्काळ लाभ मिळू शकेल.
 
१८ कोटी लायसन्स १.१२ अब्ज आधार
देशात १८ कोटींहून अधिक लोकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत. १.१२ अब्ज नागरिकांकडे आधार कार्ड आहे. एकूण लोकसंख्येच्या हे ८८.२ % आहे. देशात २.२५ कोटींपेक्षा जास्त कार आहेत. म्हणजे दर १००० व्यक्तीमागे १८ कार आहेत. देशात १६ कोटींहून जास्त दुचाकी आहेत. दररोज सरासरी ५४ हजार नव्या वाहनांची नोंदणी होते.
बातम्या आणखी आहेत...