आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IISc Bangalore And Four IIT's Figure In List Of Asia's Top 50 Universities: QS Rankings

आशियातील अव्वल 50 शिक्षण संस्थांत चार आयआयटींचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळुरू तसेच मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कानपूर आयआयटी या संस्थांचा अाशियातील ५० अग्रणी विद्यापीठांच्या यादीत समावेश झाला आहे. क्यूएस विद्यापीठाने ही रँकिंग जाहीर केली.

भारतीय संस्थांमध्ये अग्रस्थानी आयआयएससी असून या यादीत संस्थेने ३३ वे स्थान मिळवले. गेल्या वर्षी संस्था ३४ व्या स्थानावर होती. आयआयएससीसहित इतर भारतीय संस्थांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. क्यूएसने अशियातील ९२० संस्थांचे मूल्यांकन केले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)ला अाशियातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. यानंतरचे स्थान हाँगकाँग विद्यापीठाला आहे. या १७ देशांच्या यादीत भारताचे स्थान पाचवे आहे. ३५० संस्थांमध्ये २३ भारतीय विद्यापीठे आहेत. चीनचे ८२, जपानचे ७२, दक्षिण कोरियातील ५४, तर तैवानमधील ३४ संस्था आहेत.

रँकिंगचेनिकष काय? : संशोधनाचादर्जा, अध्यापनाचा दर्जा हे प्रमुख निकष होते. शिक्षणाच्या दर्जावरही लक्ष दिले गेले. मूल्यांकन करताना अध्यापकांपैकी किती जण पीएचडी झालेले आहेत, हा निकष यंदा ठेवण्यात आला.

इतर विद्यापीठांचे स्थान
कोलकाता विद्यापीठ १०८
मुंबई विद्यापीठ १४५
बनारस हिंदू विद्यापीठ १५५
अमृत विद्यापीठ १६९
पुणे विद्यापीठ १७६
अॅमिटी विद्यापीठ १९५
मणिपाल विद्यापीठ २००

संस्था रँकिंग
आयआयएससीबेंगळूरु ३३
आयआयटी मुंबई ३५
आयआयटी दिल्ली ३६
आयआयटी मद्रास ४३
आयआयटी कानपूर ४८
आयआयटी खडगपूर ५१
दिल्ली विद्यापीठ ६६
आयआयटी रुरकी ७८
आयआयटी गुवाहाटी ९४