आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो, समारंभामध्ये अंगभर कपडे घालून या; IITचा फतवा, बोर्डवर लावली नोटीस, नंतर माघार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयआयटी दिल्लीच्या वसतिगृहात पोशाखांशी संबंधित अजब फतवा काढण्यात आल्याने वाद समोर आला आहे. आयआयटीच्या "हाऊस डे' समारंभात विद्यार्थिनींनी "साधे' आणि संपूर्ण अंग झाकणारे पाश्चिमात्य किंवा भारतीय कपडे परिधान करावेत, असा आदेशच आयआयटीने जारी केला.
 
मात्र, त्यावरून वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा आदेश मागे घेतला. हाऊस डे हा आयआयटीचा वार्षिक समारंभ असतो. या समारंभासाठी विद्यार्थिनींना त्यांचे नातेवाईक किंवा अन्य पाहुण्यांना तासाभरासाठी वसतिगृहात आणण्याची परवानगी असते.
 
आयआयटी दिल्लीत येत्या गुरुवारी याचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या हिमाद्री वसतिगृहात मंगळवारी यासंबंधीची नोटीस लावण्यात आली. त्यावर वसतिगृह अधीक्षिका श्रीदेवी उपाध्यायुला यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, ही नोटीस वसतिगृहातील विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर टाकून दिली. ती प्रचंड व्हायरल झाली. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच नोटीस बोर्डवरील नोटीस तत्काळ हटवण्यात आली.
 
याबाबत विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख एस. कृष्णा म्हणाले, कुणी काेणता पोशाख घालावा याबाबत कुणीच आदेश देऊ शकत नाही. दरम्यान, उपाध्यायुला यांनी अशा प्रकारची कोणतीच नोटीस काढली नसल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...