आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIT IIM Package Increases By 500 Percent, Divya Marathi

आयआयटी मध्‍ये दोन वर्षांआधी पहिले सर्वाधिक पॅकेज २५ लाख, आता १ कोटीपेक्षा जास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई/ चंदिगड/ जयपूर/ अहमदाबाद/ इंदूर - आयआयटी-आयआयएम कॅम्पसमध्ये फेसबुक, गुगल, एक्सेंजर स्ट्रॅटेजी, गोल्डमन सेक आदी कंपन्या चांगले पॅकेज देऊ करत आहेत. गुगलने बिट्स पिलानीच्या एका विद्यार्थ्याला १.४० कोटी रुपये वार्षिक पॅकेजची ऑफर दिली आहे. देश-विदेशात सुधारलेल्या आर्थिक स्थितीचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.

ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमेन सेकही यामध्ये मागे नाही. व्यवस्थापनाच्या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी सर्वात जास्त पॅकेज देऊ केले आहे. इंटर्नची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी कंपन्यांनी भरती प्रक्रियेसाठी वर्षाचा अवधी घेतला होता. या वर्षी नोकरीच्या ऑफर्ससह नियुक्तिपत्रेही दिली जात आहेत.

२००८-०९ च्या मंदीमध्ये आयआयएम विद्यार्थ्यांचे पॅकेज २५ टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. आयआयएम कोलकातामध्ये सर्व २६५ विद्यार्थ्यांना नोक-या मिळाल्या होत्या, मात्र सरासरी पॅकेज २३ टक्के कमी होते. आयआयएम अहमदाबादमध्ये यामधील घसरण २५ टक्क्यांपर्यंत झाली होती. ही घट २००१ नंतर पहिल्यांदाच दिसून आली.

आयआयएममध्ये चांगल्या पॅकेजची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. आयआयएम अहमदाबादमध्ये देशांतर्गत पॅकेज २२.५ टक्के वाढले, आंतरराष्ट्रीय पॅकेज ३३.५ टक्क्यांहून जास्त होते. याच्या तीन वर्षांनंतर २०१३ मध्ये एसपी जैन इन्स्टिट्यूटमध्येही सरासरी पॅकेज ४० लाखांपर्यंत गेले होते. ही ३० टक्क्यांपर्यंत वाढ होती. २००८-०९ मध्ये आयआयटीमध्ये नोकर भरतीसाठी कंपन्या येण्यास तयार नव्हत्या.