आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IITs Being Used For \'anti India, Anti Hindu\' Activities: RSS Mouthpiece In Marathi

IITचा वापर हिंदूविरोधी कारवायांसाठी, RSSचा \'ऑर्गनायझर\'मधून आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'ने एफटीआयआयच्या चेअरमनपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीस विरोध करणाऱ्यांना हिंदूविरोधी ठरवले होते. यानंतरच्या एका लेखात आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्था भारत आणि हिंदूविरोधी कारवायांचे ठिकाण बनल्याचा आरोप केला आहे.

लेखामध्ये नमूद केल्यानुसार, देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांवर अद्यापही काँग्रेस आणि डाव्यांचे नियंत्रण आहे. दोन्ही पक्ष प्रशासकीय मंडळ आणि संचालकांद्वारे कोणत्याही संस्थेवर वैचारिक नियंत्रण प्राप्त करण्यात निष्णात आहेत. काही आयआयएममध्ये केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध उचललेल्या पावलांमागे राजकारण आहे. आयआयटी मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे माजी चेअरमन अनिल काकोडकर आणि आयआयएम अहमदाबादचे चेअरमन ए. एम. नाइक यांच्यावर टीका करण्यात आली आहे. दोघांनीही मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्णयांचा विरोध केला होता.

पवित्र शहर हरिद्वारमध्ये, आयआयटी रुरकीमध्ये मांसाहार तयार करण्यास सुरुवात झाली. एनआयटी राऊलकेलाच्या कम्युनिटी हॉलमध्ये पूजा करण्यास बंदी घालण्यात आली. हे प्रकार यूपीएच्या कार्यकाळात झाले. त्यामुळे करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या या संस्था भारतविरोधी आणि हिंदूविरोधी कारवायांची ठिकाणे झाली आहेत.

इफ्तार पार्टीत मोदींच्या गैरहजेरीचा संघाकडून बचाव
संघाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीचा बचाव केला आहे. टीकाकारांना उत्तर देत इफ्तार पार्टी धार्मिक आयोजन असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही धार्मिक आयोजनास कोणत्या आधारे धर्मनिरपेक्ष म्हटले जाऊ शकते, असा सवालही करण्यात आला आहे. ऑर्गनायझरमध्ये लिहिलेल्या संपादकीयमध्ये धर्मनिरपेक्ष प्रतीकांची मदत घेऊन व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांवरही हल्ला चढवण्यात आला आहे. संघ परिवाराशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने पाच जुलै राेजी इफ्तारचे आयोजन केले होते. यामध्ये पाच मुस्लिम देशांच्या राजदूतांसह संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते. त्या दिवशी त्यांनी पूर्वोत्तर राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची खूप चर्चा झाली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, २०२० पर्यंत भारत हिंद राष्ट्र होणार : अशोक सिंघल