आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Acid Selling Case Hearing Today In Supreme Court

बेकायदा अ‍ॅसिड विक्रीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभर अ‍ॅसिडच्या खुल्या विक्रीविरुद्ध लक्ष्मीने पुकारलेला लढा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याचाच परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अ‍ॅसिड विक्रीसंबंधित कायदे तयार करण्यास सांगितले आहे. अन्यथा न्यायालय त्यावर निर्बंध लादेल. लक्ष्मीच्या संघर्षामुळे सरकारला या विषयावर विचार करणे भाग पडले. अ‍ॅसिड हल्ल्यासंदर्भात भारतीय दंड संहितेमध्ये स्वतंत्र कलम जोडण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी रोजी राष्‍ट्रपतींनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.

संसदेने 19 मार्च रोजी त्यास मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत दोषीला 10 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, सध्या अ‍ॅसिडची खुली विक्री रोखण्यासाठी कोणतेच धोरण नाही. लक्ष्मीवर हल्ला करणा-याने किराणा दुकानातून अ‍ॅसिड खरेदी केले होते. हल्ल्यासाठी त्याने टॉयलेट क्लिनरचा वापर केला. यात तिचा चेहरा विद्रुप झाला. तीर्थयात्रेच्या ठिकाणी मांसाहाराला बंदी असते, त्याचप्रमाणे आपल्या समाजात अ‍ॅसिडचे महत्त्व काय? अ‍ॅसिडमुळे चेहराच नव्हे तर आत्माही जळून भस्मसात होतो, अशी भावना लक्ष्मीने व्यक्त केली.


तेजाबची विक्री होतेच कशी?
देशातील 12 राज्यांतील निवडक शहरांत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दिव्य मराठीने तेजाबच्या विक्रीसंबंधी केलेली बातचीत..
० जयपूरचे एएसपी गिरिजालाल मीणा शहरातील अधिका-यांशी भेटले- अ‍ॅसिड विक्रीला कसे रोखणार, हे तर टॉयलेट क्लिनर आहे.
० वास्तव : अ‍ॅसिड बनवण्यापासून विक्रीपर्यंतचा परवाना भारत सरकारच्या स्फोटकासंबंधीच्या विभागाकडून घ्यावा लागतो. परवानगीशिवाय अ‍ॅसिड तयार करणे किंवा विकल्यास कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व एसपींवर आहे.
० पंजाब मध्ये अ‍ॅसिडची खुली विक्री होते, परंतु विना लेबलच्या बाटलीतून अ‍ॅसिड कोणत्याही दुकानातून खरेदी केले जाऊ शकते.
० हरियाणामध्ये अ‍ॅसिडच्या विक्रीवर कोणतेही बंधन नाही, परंतु राज्यात अ‍ॅसिड पीडितावरील उपचार खर्च सरकार उचलते.
शिक्षा नव्हे जीवन
> तेजाब हल्ल्याच्या 80 टक्के महिला शिकार. त्यात 40 टक्के 18 वर्षांहून कमी वयाच्या मुलींचा समावेश.
> हल्लेखोरांत पुरुष सापडतात, विवाह, प्रेम संबंधात नकार यातून अधिक हल्ले
> 8 टक्के प्रकरणांत
आरोपीला शिक्षा
> आपल्या देशात दरवर्षी अ‍ॅसिड हल्ल्याच्या 1000 घटना घडतात. यातील 150 घटनांची तक्रार नोंदवली जाते.
कायद्यातील त्रुटी : अ‍ॅसिड हल्ल्यासाठी मार्च 2013 मध्ये
कलम 326 अ आणि 326 ब ची तरतूद आहे.
> परंतु, दुकानादुकानात विकल्या जाणा-या अ‍ॅसिडला हत्यार
मानले नाही, ते 10-20 रुपयांत सहजपणे मिळते.
> परिणाम : कायदा तयार करण्यात आल्यानंतर तीन महिन्यांत एकट्या दिल्लीत 56 अ‍ॅसिड हल्ल्याची प्रकरणे उजेडात आली.