आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Jama Masjid Imam Bukhari Appealed To Vote For Aap In Delhi Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AAP ला करा मतदान- शाही इमाम बुखारींनी केले अपील; मात्र \'आप\'ने धुडकावला पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: शाही इमाम मौलाना सैयद अहमद बुखारी)

नवी दिल्ली- जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सैयद अहमद बुखारी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बुखारी यांनी दिल्लीतील मुसलमान मतदारांनी 'आप'च्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन बुखारी यांनी केले आहे. मात्र, 'आप'च्या नेत्यांनी बुखारी यांचे समर्थन घेण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.
देशात परिवर्तन घडत आहे. त्यामुळे आपले मतही बदलले असल्याचे बुखारी यांनी म्हटले आहे. 'आप' हा झपाट्याने वाढणारा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला आता पाठिंबा दिला नाही तर भविष्यात आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. दिल्लीतील मुसलमानांनी 'आप'ला मतदान करण्‍याचे आवाहनही बुखारी यांनी केले आहे.
दिल्लीत भाजपला कोणत्याही किमतीत सत्ता मिळायला नको, असे देखील बुखारी यांनी म्हटले आहे. दिल्लीत 'आप' सगळ्यात प्रभावी पक्ष आहे. त्यामुळे 'आप'ला बहुमताने विजयी करावे असे आवाहन बुखारी यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.

बुखारींनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिला होता पाठिंबा..
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत इमाम बुखारी यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला होता. एवढेच नव्हे तर बुखारी यांनी मुलाच्या 'ताजपोशी'ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले नव्हते.