आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा देशभरात समाधानकारक पाऊस, अल निनोचा धोका नाही; सरासरी 96 टक्के पावसाचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ औरंगाबाद - देशात यंदा सरासरीइतका पाऊस होईल, असे मत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केलेल्या दीर्घकालीन अंदाजात व्यक्त केले. नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाणही यंदा देशभरात सर्वत्र चांगले राहील, असे आयएमडीचे महासंचालक के.जे. रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
यंदा इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी (हिंदी महासागराच्या दोन्ही टोकांकडील पाण्याचे तापमान) अनुकूल असल्याने भारतीय उपखंडात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
रमेश यांनी सांगितले, देशात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सरासरी ९६ टक्के पाऊस होण्याचा दीर्घकालीन अंदाज आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के दीर्घकालीन अंदाज सर्वसाधारण पाऊस मानला जातो. तर ९६ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर १०४ ते ११० टक्के अंदाज असल्यास  सरासरीहून  जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. गतवर्षी हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात जून ते सप्टेंबर २०१६ या काळात देशभरात ९७ टक्के अर्थात सरासरी इतका पाऊस झाला होता. स्कायमेट या संस्थेने मात्र यंदा देशात सरासरी ९५ टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याचे पाच निकषांचे मॉडेल
भारतीय हवामान खात्याच्या पुणे येथील केंद्राने तयार केलेल्या पाच निकषांच्या डायनॅमिक माॅडेलवर हा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
ते पाच निकष असे...
- उत्तर अटलांटिक व उ. प्रशांत महासागर पृष्ठभागाचे तापमान
- दक्षिण हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तानजीकचे तापमान
- पूर्व आशियातील समुद्रसपाटीवरील हवेचा सरासरी दाब
- वायव्य युरोपातील जमिनीवरील हवेचे जानेवारीतील तापमान
- प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तानजीकचे तापमान
 
हवामान खात्याचा अंदाज व मान्सून
वर्ष   पहिला अंदाज प्रत्यक्षात पाऊस 
  २०१०  ९८% १०२%  
  २०११  ९८% १०१%  
  २०१२  ९९% ९३%
  २०१३ ९८% १०६%
  २०१४ ९५% ८८%
  २०१५  ९३%  ८६%
  २०१६ १०६% ९७%

पुढील स्‍लाइडवर वाचा,
- अायओडी राहणार सक्रिय
- महाराष्ट्रात चांगला पाऊस
- अायओडी आणि अल-निनोतील फरक

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...