आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Impose President\'s Rule In Maharashtra, Union Cabinet Will Demand To President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्याचा निर्णय झाला.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्याने राज्य सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती.