आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटीत नरेंद्र मोदी फक्त हसले, इम्रान खानने काढला सकारात्मक अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींसोबत चर्चा करताना इम्रान. - Divya Marathi
मोदींसोबत चर्चा करताना इम्रान.
नवी दिल्‍ली - भारत- पाक मालिका कधी होते याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. किमान देशाबाहेर तरी मालिका व्हावी, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. एका कार्यक्रमासाठी दिल्लीत आलेला पाकचा माजी कर्णधार इम्रान खानने शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी भेट घेऊन मालिकेसाठी आग्रह धरला. तेव्हा मोदी फक्त हसले.मात्र त्यांनी कोणताही शब्द दिला नाही. असे असले तरी त्यांच्या या हसण्याचा अर्थ इम्रान खानला सकारात्मक वाटला.
काय म्‍हणाले इम्रान ?
मी भारत- पाकिस्तान मालिकेला मंजुरी द्या, म्हणालो तेव्हा मोदी फक्त हसले. प्रत्येक समाजात आजारी लोक असतात. म्हणून सर्व समाजावर बहिष्कार नको. संपर्क वाढला तर संबंध सुधारतील, वस्तुस्थिती कळेल. कटऑफ कराल तर नफरतच वाढेल, असे इम्रान खान म्‍हणाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो...