आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान होता इंडियन मुजाहिदीनच्या संपर्कात, अटकेतील १४ हस्तकांचेही थेट संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वैजापूरच्या इम्रान पठाणसह अटकेतील १४ हस्तक इसिस या दहशतवादी संघटनेचा विश्वासू इंडियन मुजाहिदीनच्या हँडलरच्या संपर्कात होते, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हल्ले घडवण्याचा कट आखत असलेले इसिसचे हे १४ हस्तक एकमेकांच्या सातत्याने संपर्कात होते इंडियन मुजाहिदीनचा माजी हँडलर सफी अम्रार उर्फ युसूफकडून वारंवार निर्देश घेत होते. या हस्तकांनी चॅटिंग करताना वापरलेले सर्व्हर लोकेट करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी एनआयए परदेशी तपास संस्थांशी संपर्क साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे सर्वजण महाराष्ट्रातील मालवणी, मुलूंड आणि मालाडमधून बेपत्ता झालेल्या युवकांच्याही संपर्कात होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. या चार जणांपैकी दोघे माघारी परतले तर दोघे इसिसमध्ये भरती झाले आहेत.

सतत ई-मेल बदलायचा
इम्रान पठाणसह अटकेतील १४ जणांना वारंवार ई-मेल आयडी बदलण्याचे निर्देश त्यांच्या हँडलरने दिले होते. त्यानुसार ते नियमितपणे ई-मेल आयडी बदलत होते. तपास संस्थांना त्यांचा नेमका ठावठिकाणा लागू नये, हे मागचे मुख्य कारण होते.