आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Country 53 Percent Rain Fall , Estimated By MET Department

देशाच्या 53 टक्के भागात सरासरी पाऊस पडला, हवामान विभागाच्या अंदाज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - या वर्षीचा मान्सून देशाला लाभदायक ठरला आहे. देशातील एक तृतीयांश भागात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 जून ते 18 सप्टेंबरदरम्यान देशाच्या 53 टक्के भागात सरासरी पाऊस पडला. मात्र, त्याचबरोबर काही भागात 28 टक्के इतका कमी पाऊस पडला.

हवामान विभागाने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत सरासरी 864 मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 4 मि.मी. जास्त आहे. जम्मू आणि काश्मीर, पूर्व व पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ तसेच अंदमान व निकोबार बेटांवर जास्त पाऊस झाला. कमी पाऊस पडलेल्या भागात संपूर्ण उत्तर भारत, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, तामिळनाडू, भारताची पूर्व पश्चिम किनारपट्टी, लक्षद्वीप बेट यांचा समावेश आहे. दिल्ली व हरियाणामध्ये कमी पर्जन्यमान झाले. बिहार, झारखंडसह ईशान्य भारताच्या बहुतांश भागात कमी पाऊस पडला. या ठिकाणी 965 मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरी 1334 मि.मी.पेक्षा तो 28 टक्के कमी आहे. बिहार सरकारने 38 पैकी 33 जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे.