आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात ६८६ पैकी फक्त १७ जिल्हेच पाणंदमुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील ६८६ जिल्ह्यांपैकी फक्त १७ जिल्हे पाणंदमुक्त घोषित केले आहे, असे केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत सांगितले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छता अभियानाने जोर पकडला असल्याचा दावा सरकारने केला. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, २७ जुलै २०१७ पर्यंत देशातील १७ जिल्हे, २२३ ब्लॉक्स, ३१,०७७ ग्रामपंचायती आणि ६८,८०८ खेड्यांनी पाणंदमुक्तीची घोषणा केली. मिशनअंतर्गत ग्रामीण भागात २०७.४९ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. शौचालय बांधणीच्या प्रमाणात ५३.४५ टक्के वाढ झाली आहे. शहरी भागात ५८ शहरे हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली आहेत. जून २०१६ मध्ये सुमारे २१.४४ लाख व्यक्तींनी शौचालय बांधणीस सुरुवात केली. त्यापैकी २०.७३ लाख शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले, असेही तोमर म्हणाले.

२ ऑक्टोबर २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रमाने वेग घेतला आहे. स्वच्छता ही वर्तनविषयक बाब असून स्वच्छ भारत मिशनअंतर्गत लोकांच्या सवयी बदलण्यावर भर देण्यात येत आहे. लोकांना सुरक्षित स्वच्छतेचा अंगीकार करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे, असे तोमर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...