आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाची तयारी: देशांतर्गत 22 हायवे होणार रनवे, फायटर प्लेनचे होऊ शकेल लँडिंग-टेकऑफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागीलवर्षी मिराज-2000 यमुना एक्स्प्रेस-वेवर उतरवण्यात आले होते. - Divya Marathi
मागीलवर्षी मिराज-2000 यमुना एक्स्प्रेस-वेवर उतरवण्यात आले होते.
नवी दिल्ली - युद्ध झाले तर केवळ देशाचे लष्करच नाही तर देशातंर्गत रस्तेही फायटर प्लेनची लँडिंग आणि टेकऑफसाठी तयार असले पाहिजे, यादृष्टीने संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्रालय काम करीत आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानने इस्लामाबादेतील हायवेचा रनवेसारखा वापर केला होता. तर, भारताने मागील वर्षी 'मिराज-2000' यमुना एक्स्प्रेस-वेवर उतरवले होते.
केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिलेल्या सांगितल्यानुसार, जिथे विमानांची कनेक्टिव्हिटी नाही अशा ठिकाणी देखील फायटर प्लेन पोहोचू शकतील या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
- गडकरींनी सांगितले, की या संबंधीचा प्रस्तावाला अंतिम रुप देण्यासाठी लवकरच संरक्षण आणि रस्ते विकास व परिवहन मंत्रालयाची बैठक होणार आहे.
- अधिकाऱ्यांनी सांगितले, की दोन्ही मंत्रालयांची मिळून एक समिती तयार केली गेली आहे. ही समिती तांत्रिकदृष्ट्या हे कसे शक्य आहे याचा अहवाल देणार आहे.
4 राज्यांमधील 22 हायवे होणार डेव्हलप
- सध्या देशातील 22 महामार्गांना यासाठी निवडण्यात आले आहे. हे महामार्ग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील असणार आहेत.
- एअरफोर्सनेही परिवहन मंत्रालयाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यासाठी राज्यांची मदत घेण्यासा सांगितले आहे. त्यामुळे हायवेला रनवेमध्ये बदलण्याच्या कामाला वेग येईल.
पाकिस्तानला मागे टाकू
- पाकिस्तानमध्ये दोन हायवेवर फायटर प्लेन लँड केले जाऊ शकतात. त्यावर चार रनवे आहेत.
- त्यातील एक एम-1 हायवे पेशावर ते इस्लामाबाद जोडणारा आहे. तर दुसरा एम-2 हायवे लाहोर ते इस्लामाबाद असा आहे.
- पाकिस्तानने 2000 मध्ये या हायवेवर फायटर प्लेन लँड करण्याची ट्रायल घेतली होती.
भारताला का वाटली रोडला रनवे करण्याची आवश्यकता
- बीबीसीच्या 1971 च्या रिपोर्टानुसार, बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान पाकिस्तान एअरफोर्सचे काही विमान तेव्हा आग्रापर्यंत आले होते. वास्तविक ते कोणतेही नुकसान किंवा बॉम्ब वर्षाव करु शकले नाही. भारतीय एअरफोर्सने त्यांना पिटाळून लावले होते.
- तेव्हापासून भारतातील महामार्गांवर फायटर प्लेन उतरवण्याचा पर्याय समोर येत राहिला आहे.
गेल्या वर्षी केली होती टेस्टिंग
- 21 मे 2015 ला मिराज-2000 विमान यमुना एक्स्प्रेस-वेवर उतरवण्यात आले होते. इंडियन एअरफोर्सचे एखादे विमान रस्त्यावर उतरवण्याची ही पहिलीच वेळ होती.
- एअरफोर्सच्या एका हेलिकॉप्टरनेही एक्स्प्रेस-वेवर लँडिंग केली होती.
- ग्रेटर नोएडा ते आगराला जोडणाऱ्या यमुना एक्स्प्रेस-वेला तेव्हा सर्वसामान्यांसाठी बंद केले गेले होते.
बातम्या आणखी आहेत...