आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In India, More People Ended Their Lives Over Love Than Property

24 तासांत 12 प्रेमवेडे देतात जीव, गरिबी - बेरोजगारीपेक्षा जास्त धोकादायक अपयशी प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशामध्ये एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने खचून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गरीबी, बेरोजगारी, आर्थिक दिवाळखोरी या पेक्षा प्रेमामध्ये आलेल्या अपयशातून मरणाला कवटाळणार्‍यांची संख्या अधिक आहे. कौटुंबिक कारणे आणि आजारपणाला कंटाळून केलेल्या आत्महत्यांनंतर लव्ह अफेअरचा तिसरा क्रमांक लागत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याशिवाय आत्महत्यांसाठी काही नवी कारणेही समोर आली आहे. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर आत्महत्या करणारांची संख्या 2012 च्या तुलनेत 2013मध्ये 64.5 टक्क्यांनी वाढली आहे. समाजात पत खालावणे, करिअर मधील समस्या, घटस्फोट, लग्न रद्द होणे यासारखी आत्महत्येची नवी कारणे उघड झाली आहेत.
संपूर्ण देशातील गुन्हांची आकडेवारीसह माहिती जतन करणारी संस्था नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) 2013 मधील विविध गुन्ह्यांची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार देशात प्रेमात अपयश आल्यामुळे रोज 12 जण आत्महत्या करीत आहेत. तर, गरीबीमुळे पाच, दिवाळखोरीच्या कारणाने सात आणि बेरोजगारीमुळे सहा जण रोज आत्महत्या करतात.
पुढील स्लाइडमध्ये, रोज 89 लोक कौटुंबिक समस्यांमुळे मरणाला कवटाळतात. जाणून घ्या कोणत्या आजारांमुळे करतात सर्वाधिक आत्महत्या...