आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Interview: Vijay Mallya Said, I Have No Plan To Leave UK

विजय माल्या म्हणाले, \'मी UK सोडणार नाही, माझ्या अटकेने पैसे मिळणार नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नऊ हजार कोटींचे कर्ज घेऊन फरार झालेले विजय माल्या यांना परत आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. माल्यांनी यूकेमध्ये फायनान्शिअल्स टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 'माझ्या अटकेमुळे पैसा मिळणार नाही. मी यूके सोडणार नाही. येथे मी बलजबरीच्या विजनवासात राहात आहे. मी पैसे देण्यास तयार होतो पण बँकांना माझा प्रस्ताव मान्य नव्हता.' गुरुवारी भारत सरकारने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना पत्र पाठवून माल्यांना भारताला सोपवण्याची मागणी केली होती. 2 मार्च पासून माल्या यूकेमध्ये आहेत.
भारत-ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार झालेला असला तरी मल्ल्यांना भारतात परत आणणे सोपे नाही. करारातील नववे कलम मल्ल्यांना वाचवू शकते. प्रत्यार्पणासाठी आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार ते करू शकतात. यामुळे त्यांना भारतात आणण्यात विलंब होऊ शकतो किंवा ते ब्रिटनमधूनही पळ काढू शकतात.
भारताने पत्रात काय लिहिले...
> परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली.
> त्‍यांनी सांगितले, ''दिल्‍लीत असलेल्‍या ब्रिटेनच्‍या उच्‍चायुक्‍तांना पत्र लि‍हून माल्‍यासंदर्भात माहिती मागितली. ''
> ''ब्रिटिश सरकारकडे आम्‍ही हा मुद्दा लावून धरणार आहोत.''
> ''यूकेमध्‍ये असलेल्‍या भारतीय उच्‍चायुक्‍तांनीसुद्धा याच प्रकारचे पत्र यूके आणि कॉमन्वेल्थ ऑफिसेजला पाठवले.

माल्‍यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द
> समन्स बजावूनही माल्‍या हजर झाले नाहीत, त्यामुळे मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी 'ईडी'ने केली होती.
> त्यानुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने माल्‍यांचा पासपोर्ट चार आठवड्यांसाठी स्थगित केला.
> माल्‍या यांनी लंडनला जाताना राज्यसभा खासदार असल्याने मिळालेल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे 'ट्रीटी'