आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Jammu Kashmir Attack Made By Pakistani Soliders A.K. Antony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मिरातील पुंछमधील हल्ला पाकिस्तानी सैन्याचाच, अँटनी बोलले संरक्षण मंत्र्यासारखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अखेर तीन दिवसांनंतर ए.के. अँटनी भारतीय संरक्षण मंत्र्यांसारखे बोलले. जम्मू-काश्मिरातील पुंछमध्ये पाकिस्तानी सैन्यानेच हल्ला केला होता. तोदेखील त्यांच्या स्पेशालिस्ट ग्रुपने. दगाफटका करून भारतीय जवानांची हत्या करण्यात आली, असे अँटनी यांनी गुरुवारी संसदेत सांगितले.

हल्ल्याचा परिणाम नियंत्रणरेषेवरील व्यवहार व पाकिस्तानशी संबंधांवर होईल, असे ते म्हणाले. त्यावर भाजप नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, राजकारण करत असल्याचा आरोप आमच्यावर होत होता. पण संरक्षणमंत्र्यांची चूक सुधारण्याचा आमचा प्रयत्न होता. निवेदनावर आम्ही समाधानी आहोत, परंतु पुढे अशी चूक होऊ नये, असे सुषमा म्हणाल्या.


8 ऑगस्ट : लोकसभेत संरक्षणमंत्री
6 ऑगस्टला संसदेत मी जे वक्तव्य केले ते त्या वेळी सरकारकडे उपलब्ध माहितीच्या आधारे होते. आता पाक लष्कराच्याच एका विशेष गटाने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.


6 ऑगस्ट : राज्यसभेत ए. के. अँटनी
पाकिस्तानी लष्कराच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जुलै-ऑगस्टमध्ये 19 अतिरेकी मारले गेल्यानंतरची ही प्रतिक्रिया होती.


बिहारच्या मंत्र्याची मुक्ताफळे,
जवान हे तर शहीद होण्यासाठीच असतात
पुंछमध्ये जवान शहीद झाल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यातच बिहारमधील मंत्री भीमसिंह यांनी गुरुवारी जवान तर शहीद होण्यासाठीच असतात, असे वक्तव्य केले आहे. भीमसिंह बिहार सरकारचे प्रवक्तेही आहेत. हौतात्म्याचा हा अवमान असल्याची प्रतिक्रिया उमटताच विरोधकांनी भीमसिंह यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी फोनवरूनच मंत्र्यांना झापले. त्यानंतर भीमसिंह यांनी जनतेची व शहिदांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या आहेत. एक नव्हे, शंभर वेळा माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. नितीश यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.


मुंडे म्हणाले, दहशतवाद्यांनी केला हल्ला..
शहीद माने यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित गोपीनाथ मुंडे यांनी पूंछमधील हल्ल्याला दहशतवादी हल्ला संबोधले. ते काय म्हणाले त्यांच्याच शब्दांत..‘पाकच्या बॉर्डरवर आतंकवाद्यांनी हमला केला. मानेसारख्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सैनिकाने देशासाठी बलिदान दिले. कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील अनेक जण मिलिटरीमध्ये आहेत. अंत्ययात्रेतही अनेक माजी सैनिक उपस्थित आहेत. मी शहीद माने यांना अभिवादन करतो.’