आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In laws Living Far From Couple Can’t Be Tried Under Domestic Violence Act: HC

वेगळे, दूर राहणार्‍या सासू-सासर्‍यांवर छळाचा गुन्हा नोंद होऊ शकत नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखाद्या महिलेचे सासू-सासरे वेगळे राहत असतील तर तिला त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल होणार नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.

न्यायमूर्ती जी. पी. मित्तल यांनी म्हटले आहे की, काही प्रकरणांत वेगळे किंवा दूर राहणार्‍या सासू-सासर्‍यांकडून होणार्‍या छळाला महिलेस सामोरे जावे लागते. अशा वेळी महिलेला कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याऐवजी भारतीय दंड विधानातील इतर तरतुदींचा आधार घेता येऊ शकेल. कारण एकाच घरात राहत असताना होणारी छळाची कृती कौटुंबिक हिंसाचारसंबंधी कायद्यामध्ये समाविष्ट होते. मारहाण, भावनिक, आर्थिक, शारीरिक, लैंगिक अशा कृती या कायद्यात मोडते. एखादी व्यक्ती जवळ राहून घरातील सर्व वस्तूंचा वापर करत असेल तरच ती कौटुंबिक हिंसाचाराच्या कक्षेत येऊ शकते, असेही कोर्टाने म्हटले आहे.