आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पूर्ती' प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ- गडकरींचे एक पाऊल मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पूर्ती उद्योग समुहात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. राज्यसभेत मंत्रिमहोदय अरूण जेटलीजींनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तरीही संसदेला सांगतो की पूर्ती उद्योग समुहात जर काही गैरव्यवहार सिद्ध झाला तर आपण मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा देऊ, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत सांगितले.
राज्यसभेत मागील शुक्रवारपासून पूर्ती उद्योग समुहावर कॅगने ठेवलेल्या ठपक्यामुळे काँग्रेसने कामकाज चालू दिले नाही. आज मंगळवारीही विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ घातला. यानंतर दुपारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. माननीय नितीन गडकरी यांच्याविरोधात कॅगच्या अहवालात काहीही ठपका ठेवला नाही. त्यामुळे गडकरींनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. पूर्ती उद्योग समुहाने काही गडबड केली असे तुम्हाला वाटत असेल तर त्याबाबत योग्य ती कारवाई होईल असेही जेटलींनी सांगितले.
दरम्यान, जेटली यांच्या स्पष्टीकरणानंतर गडकरी यांनीही राज्यसभेत निवेदन दिले. पूर्ती उद्योग समुहात कोणताही गैरव्यवहार नाही. तसेच त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तरीही विरोधकांना येथे काही गैरव्यवहार झाला आहे असे वाटत असेल तर आरोप सिद्ध करावेत. आरोप सिद्ध झाल्यास आपण 24 तासात मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असे गडकरींनी राज्यसभेत सांगितले.
गडकरी कुटुंबाशी संबंधित पूर्ती उद्योगसमूहाला कर्जे देताना अनियमितता झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आल्याने गडकरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी सोमवारीही राज्यसभेत गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, आपल्या विरोधात भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसल्याचे सांगत गडकरींनी राजीनाम्यास नकार दिला होता. सरकारी मालकीच्या भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेने (इर्डा) नागपूरमध्ये 22 मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्याला 46.63 कोटींचे कर्ज दिले होते. त्याचे व्याजही चुकते केल्याचे स्पष्टीकरण गडकरींनी दिले. मात्र, गडकरींनी एक पाऊल मागे येत या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ असे सांगत माघार घेतली.
काय आहे प्रकरण?
पूर्ती साखर कारखान्याला इर्डाने 75 टक्के वीजनिर्मिती अपारंपरिक स्त्रोतांमार्फत व 25 टक्के वीज अन्य स्त्रोतांमार्फत करण्याच्या अटीवरच कर्ज दिले होते. मात्र, पूर्तीने 100 टक्के वीजनिर्मिती कोळशावर केली. असा बदल कसा काय केला? प्रारंभापासूनच पूर्तीने घोळ घातला. नंतर हा प्रकल्प एनपीए जाहीर करण्यात आला. एनपीए घोषित केल्यानंतर कसे काय कर्ज घेऊ शकता?, असा आक्षेप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतला होता.
बातम्या आणखी आहेत...