आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In SC Today: Can Unwed Mother Be Child’S Guardian Without Father’S Nod?

अविवाहीत मातेला मिळू शकते पालकत्व, पित्याच्या संमतीची गरज नाही - SC

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अविवाहित मातेला आपल्या मुलांचे पालकत्व हवे असेल तर त्यासाठी पित्याच्या मान्यतेची गरज नसेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला. याचिकेत महिलेने मुलांच्या कस्टडीसाठी पित्याच्या मान्यतेच्या अटीला आव्हान दिले होते.
कायदा काय सांगतो ?
The Guardians and Wards Act आणि Hindu Minority and Guardianship Act नूसार मुलांच्या कस्टडीसाठी याचिका दाखल केली गेली तर पित्याची परवानगी घेण्यासाठी त्याला नोटीस पाठवली जाते. महिलेने या अटीला आव्हान दिले होते. महिलेने युक्तिवाद केला होता, की जर दोघांतील संबंधाचा खुलासा झाला तर दोघांच्या पुढील आयुष्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. महिलेने म्हटले होते, की पित्याच्या नावाचा उल्लेख होऊ नये हा माझा अधिकार आहे. त्यासाठी महिलेने तर्क दिला होता, की मुलांच्या संगोपनात पित्याची भूमिका काहीही नाही. त्याच्याशी त्याला देणे-घेणे देखील नाही. एवढेच नाही तर त्याला एखादे मुल आहे याची देखील माहिती नाही.
जर पासपोर्ट अर्जावर वडिलांचे नाव लिहिणे गरजेचे नाही तर, तिच व्यवस्थ्या असाधारण परिस्थितीत मुलांच्या कस्टडी प्रकरणात का स्विकारली जाऊ नये, असा सवालही महिलेने उपस्थित केला होता.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, सुप्रीम कोर्टात महिलेला कोणी केली मदत