आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, सुपर रिच जैसे थे; जाणून घ्या कसा असेल तुमचा इनकम टॅक्स स्लॅब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर कपातीची घोषणा केली आहे. यापूर्वी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता. आता ही मर्यादा वार्षिक 3 लाख रुपये करण्यात आली आहे. 3 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर याआधी 10% कर होता, तो आता निम्मा अर्थात 5% करण्यात आला आहे. 5 ते 10 लाख रुपयांच्या स्लॅबमधील कररचना जैसे थे ठेवण्यात आली आहे. इन्व्हेस्टमेंट दाखविल्यानंतर 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना वार्षिक 12,500 रुपये सुट मिळू शकते. 
 
कसा बदलला टॅक्स स्लॅब 
 
अशी होती पूर्वीची योजना 
- 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते.
- 2.5 ते 5 लाख रुपय उत्पन्नावर 10% कर आकारला जात होता.
- 5 ते 10 लाख रुपये उत्पन्नावर 20% कर होता.
- 10 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30% कर. 
- या सर्व स्लॅबमधील इनकम टॅक्सवर 3% एज्यूकेशन सेस लावला जात होता. 
 
नवा बदल असा समजून घ्या.. 
- 3 ते 3.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 2500 रुपये कर आकारला जाणार.
- 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्नावर 2500 रुपये कर आकारला जाईल. 
- 3 ते 5 लाख रुपये उत्पन्नावर 5% कर असेल.
- 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर लागेल.
- 10 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30% कर कायम ठेवण्यात आला आहे. 
 
3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असे होईल टॅक्स फ्री
- सध्या अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स द्यावा  लागतो.
- म्हणजे 50 हजार रुपये टॅक्सेबल इनकम आहे. त्यावर 5% कर अर्थात 2500 रुपये कर आहे.
- सरकारने 3 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 2500 हजार रुपयांची सुट दिलेली आहे. अशा प्रकारे तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असेल तर ते करमुक्त होते. 
 
सुपर रिचसाठी किती टॅक्स 
- जेटली म्हणाले 50 लाख ते 1 कोटी रुपये वार्षिक कमाई असलेल्या 30% टॅक्स आणि 10% सरचार्ज द्यावा लागेल. 
- तर, एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 30% टॅक्स आणि 15% सरचार्ज द्यावा लागेल. 
 
टॅक्स स्लॅबमधील बदलामुळे किती दिलासा 
- 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला वार्षिक 3090 रुपये कर आकारला जात होता. आता तो करमुक्त झाला आहे.
- वार्षिक 5 लाख रुपये उत्पन्नावर आधी 23,690 रुपये कर होता आता तो, 12,875 रुपये द्यावा लागेल. अर्थात 10,815 रुपयांचा रोख फायदा झाला आहे.
- वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना आधी 1,28,750 रुपये कर भरावा लागत होता. आता 1,15,875 रुपये कर द्यावा लागेल. म्हणजे 12,875 रुपये बचत होणार आहे. 
नोटबंदी दरम्यान मोठी रक्कम जमा, तरीही टॅक्स देण्यात लोक मागे
- जेटलींनी अर्थसंकल्पिय भाषणात टॅक्स भरण्याबद्दल समाजात असलेल्या उदासीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जे लोक टॅक्स भरत नाही ते प्रामाणिकपणे टॅक्स जमा करणाऱ्यांचा एक प्रकारे अपमान करतात.
- जेटलींनी नोटबंदीदरम्यान जमा झालेल्या बड्या खातेदारांची आकडेवारीच सादर केली. 
- नोटबंदीदरम्यान 1.09 कोटी बँक खात्यांमध्ये 2 ते 80 लाख रुपये जमा झाले. सरासरी 5 लाख रुपये जमा झाले होते. 1.48 कोटी बँक खाते असे होते ज्यामध्ये 80 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. प्रत्येक खात्यामध्ये सरासरी 3.31 कोटी रुपये नोटबंदीदरम्यान जमा झाले.
- जेटलींनी हे देखील सांगितले की देशात फक्त 76 लाख लोक असे आहेत ज्यांनी आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. त्यातीलही 56 लाख लोक पगारदार आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...