आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक करणे झाले सोपे; आयकर विभागाकडून नवी ई -सुविधा लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यासाठी आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर https://incometaxindiaefiling.gov.in ही लिंक जाहीर केली आहे. - Divya Marathi
यासाठी आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर https://incometaxindiaefiling.gov.in ही लिंक जाहीर केली आहे.
नवी दिल्ली - आयकर विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांना लिंक करण्यासाठी नवीन ई-कनेक्टिव्हिटी सुविधेचा आरंभ केला आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी ही लिंकिंग अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर https://incometaxindiaefiling.gov.in ही लिंक जाहीर केली आहे. या लिंकवर जाऊन आपणही आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांक एकमेकांना जोडू शकता...
 
असे करता येईल लिंक
- दोन्ही युनिक क्रमांक एकमेकांना जोडण्यासाठी सर्वप्रथम आयटी विभागाच्या ई-सुविधा संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर एक नवीन लिंक देण्यात आली आहे. नवीन लिंकवर क्लिक करताच, एक नवीन संकेतस्थळावर पाठवले जाईल. याच ठिकाणी आपण आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकून तपशील द्यावा लागेल. 
- यानंतर युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आपला आधार क्रमांक पडताळून पाहिला जाईल. सर्व माहिती योग्य असल्यास दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक झाल्याचे निश्चित होईल. 
 
नावात चूक असल्यास ओटीपी आवश्यक
- आधार कार्डवर आपले नाव चुकीचे असल्यास त्यासाठी एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) देऊन त्यांची सत्यता तपासली जाईल. हा ओटीपी संबंधितांच्या आधारच्या वेळी नोंदणीकृत केलेल्या मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीवर पाठवला जाईल. 
- दोन्ही कार्ड क्रमांक एकमेकांना जोडण्यासाठी दोन्हीवर आपला जन्मतारीख आणि लिंग एकच हवा. त्याशिवाय आधार आणि पॅनकार्ड लिंक करता येणार नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...