आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राप्‍तीकर अधिकाऱ्यांना विनापरवानगी दुकानात प्रवेश नाही, दुकानदारांना केंद्राचा दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आधीच जीएसटीमुळे हवालदिल झालेल्या व्यापारी- दुकानदारांसाठी केंद्राने शनिवारी दिलासादायक स्पष्टीकरण जारी केले. प्राप्तिकर विभागाचा कोणताही अधिकारी परवानगीशिवाय व्यापारी किंवा दुकानदाराच्या परिसरात प्रवेश करू शकत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
 
एखादा अधिकारी तसे करत असेल तर विभागाचा हेल्पलाइन क्रमांक ०११-२३३७०११५  वर याची तक्रार केली जाऊ शकते. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जीएसटी अधिकारी होऊन दुकानदार-ग्राहकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जीएसटीच्या मुख्य आयुक्तांनी (दिल्ली विभाग) दिलेल्या माहितीनुसार विभागाचे अधिकारी परवानगीशिवाय कोणत्याही दुकानदार व व्यापाऱ्याच्या परिसरात प्रवेश करू इच्छित नाहीत.
 
वस्तूंवर ७ व सेवांवर ५ श्रेणीत विभागणी  
जीएसटीच्या विविध दरांनुसार वस्तूंना ७ श्रेणीत विभागले आहे. ०%, ०.२५%, ३%, ५%, १२%, १८%, व २८%. याच पद्धतीने सेवांना पाच श्रेणीत विभागले आहे.  ०%,  ५%, १२%, १८% व २८%. आहे.

रेट फाइंडर अॅप लाँच
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी जीएसटी दरांची माहिती देणारे ‘जीएसटी रेट फाइंडर’ नावाचे अॅप लाँच केले. हे अॅप ग्राहकांना एखाद्या वस्तू वा सेवेच्या खरेदीपूर्वी त्यावर लावलेल्या जीएसटी दरांची माहिती देईल. हे अॅप कोणत्याही स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येईल. तसेच ते इंटरनेट नसतानाही चालेल. अॅपमध्ये एखाद्या वस्तू व सेवेचे नाव टाकल्यानंतर त्याचे दर समोर येईल.
बातम्या आणखी आहेत...