आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाकर,सीमा शुल्काची 400 कोटींची चुकवेगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात जानेवारी ते मार्च या काळात सेवाकर आणि सीमा शुल्काच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अबकारी गुप्तहेर (डीजीसीईआय), महासंचालक महसूल गुप्तहेर (डीआरआय) या महत्त्वाच्या महसुली गुप्तहेर संस्थांच्या वतीने तीन महिन्यांत करण्यात आलेल्या पाहणीतून ही धक्कादायक माहिती हाती आली आहे.

23 हजारांवर बँकिंग खात्यांवरील व्यवहारांचा अभ्यास करण्यात आला. त्यात 1 हजार 443 खात्यांवरील व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे. यासंबंधीच्या अहवालात (एसटीआर) ही माहिती देण्यात आली. डीजीसीईआय विभागाकडून 50 कोटी रुपयांची चुकवेगिरी पकडण्यात आली. त्यातील 28 कोटी वसूलही करण्यात आले. डीआरआयकडून करण्यात आलेल्या पाहणीतून 335 कोटी रुपयांची चुकवेगिरी स्पष्ट झाली आहे. कॅश ट्रान्झेक्शन रिपोर्ट्स (सीटीआर) कडून 400 कोटी रुपयांच्या चुकवेगिरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.