आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या ‘डीए’त वाढ; वेतनवाढीबाबतच्या विधेयकांना मंजुरीची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालय आणि देशातील ३४ उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. आता त्यांच्या महागाई भत्त्याचा दर १३९ टक्के असेल. वाढलेला दर १ जुलैपासून लागू होईल. न्यायमूर्तींच्या डीएत झालेली ही वाढ सहाव्या वेतन आयोगाच्या आधारावर करण्यात आली आहे.  

न्यायमूर्तींना सातव्या वेतन आयोगाचे लाभ देण्याबाबतच्या दोन विधेयकांना मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या वेतनाशी संबंधित ही विधेयके संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केली जातील अशी अपेक्षा आहे. संसदेच्या मंजुरीनंतर न्यायमूर्तींना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढलेले वेतन १ जानेवारी २०१६ पासून दिले जाईल. सूत्रांनी सांगितले की, न्यायमूर्तींच्या समितीने जेवढ्या वेतनवाढीची शिफारस केली आहे तेवढी वेतनवाढ होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना २.८० लाख, तर उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींना २.५० लाख रुपये वेतन देण्याची शिफारस समितीने केली होती. 
बातम्या आणखी आहेत...