आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दरदिवशी १०० अत्याचार, राज्यात महिला गुन्हेगार वाढल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धक्कादायक : ४६% अपहरण खंडणीसाठी नव्हे तर विवाहासाठी अपहृतांत ७५% महिलांचा समावेश

नवी दिल्ली- नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) देशभरात २०१४ मध्ये झालेल्या गुन्ह्यांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशात महिलांवर दर दिवशी सरासरी १०० बलात्कार होत आहेत. सर्वात जास्त बलात्कार हे मध्य प्रदेशात झाले आहेत. तर खुनाच्या सर्वाधिक घटना या महाराष्ट्रात व घडल्या असून त्यातील आरोपी व गुन्हेगार महिलांची संख्याही राज्यात वाढली असल्याचे धक्कादायक वास्तव यातून पुढे आले आहे.

२००१३ ते २०१४ या कालावधीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये ३५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजे या कालावधीत दर दिवशी १४ अत्याचार झाले आहेत. दुसरीकडे हत्या व अपहरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे सर्वात जास्त ३०० हत्या या प्रेमप्रसांगातून घडल्या आहेत. दिल्ली चोरीच्या घटनांची "राजधानी' ठरली आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे देशात गेल्या पाच वर्षांत अपहरणाच्या अडीच लाखांपेक्षा जास्त घटना उघडकीस आल्या आहेत. पैकी ४६ टक्के अपहरण हे खंडणीसाठी नव्हे तर लग्नासाठी झालेले आहेत. ४१० मुलांचे अपहरण हे निपुत्रिक दाम्पत्याला मूल विकण्यासाठी किंवा दत्तक घेऊन देण्यासाठी झालेले आहेत. याला स्त्री - पुरुष विषमतेचे प्रमाण कारणीभूत असल्याचे सामाजिक विश्लेषकांचे मत आहे.
पुढील स्लाइड्सवर राज्य निहाय वाचा, गुणेगार महिलांची आकडेवारी...