आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ind Vs Sa Rajkot One Day Hardik Threatens To Block Match

आज \'भाजपविरुद्ध हार्दिक\' सामना, राजकोटमध्‍ये केली इंटरनेट सेवा ठप्‍प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळाडूंच्‍या हॉटेलबाहेर असलेली सुरक्षा. - Divya Marathi
खेळाडूंच्‍या हॉटेलबाहेर असलेली सुरक्षा.
राजकोट – गुतरातमधील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर आज (रविवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामना होत आहे. मात्र, पटेल समजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पटेल समजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दोन्‍ही संघाच्‍या खेळाडूंना रस्‍त्‍यातच अडवण्‍याची धमकी दिली. दरम्‍यान, शनिवारी पाटीदार पटेल समाजकडून एक मॅसेज व्‍हायरल करण्‍यात आला असून, यात म्‍हटले, ‘जर राजकोटमध्‍ये आजच्‍या मॅचमध्‍ये पाटीदार समाजाच्‍या कुण्‍याही व्‍यक्‍तीला एक ओरखडा जरी पडला तर हार्दिक आणि लालजी (आंदोलनाचे दोन्‍ही नेता) कोणालाच सोडणार नाहीत,' असे त्‍यात म्‍हटले. राज्‍य सरकारने खबरदारी म्‍हणून कडोकोड बंदोबस्‍त ठेवला असून, राजकोटमध्‍ये सकाळी 8 वाजतापासून इंटरनेट सेवा बंद केली आहे.

प्रेक्षक येताहेत मैनादात, कडक सुरक्षा
आज सकाळी 11 वाजतापासून प्रेक्षक मैदानात येत आहेत. दरम्‍यान, अनुसचित प्रकार टाळण्‍यासाठी कडक सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात करण्‍यात आली असून, खेळाडुंच्‍या हॉटेलबाहेरही सिक्युरिटी वाढवण्‍यात आली आहे. मैदानाच्‍या परिसरात येणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्‍यान, मॅचदरम्‍यान काहीही हिंसक कृत्‍य झाले तर त्‍याला हार्दिक पटेलच जबाबदार धरण्‍यात येईल, शहर पोलिस अधीक्षक गगनदीप गंभीर यांनी स्‍पष्‍ट केले.

तिकीट नाकारल्‍याचा आरोप
या सामन्‍याची तिकिटे पटेल समाजाला देण्‍यात आली नाही, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला असून, हा सामना उधळून लावण्याचा इशारा त्याने दिला आहे.
भाजपने घेतली 20 हजार तिकीटे विकत
पटेल समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांना मैदानावर प्रवेश मिळू नये आणि सामन्या दरम्यान हार्दिकचे आरक्षण आंदोलनाचे शक्तीप्रदर्शन निष्प्रभ करण्यासाठी भाजपानेही आपल्या समर्थकांसाठी वीस हजार तिकीटे विकत घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान करून भाजपा समर्थक स्टेडियममध्ये येतील अशी चर्चा आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....