आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Aginst Net Neutrality Campaign On Social Networking

#NETNEUTRALITY: मला इंटरनेटमध्ये पैसे घालण्यापेक्षा मित्रांसोबत मस्ती करायला आवडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटचे बाजारीकरण होऊ नये याकरिता नेटीझन्स सध्या जास्त सक्रीय झाले असल्याचे दिसते. आज लोकसभेतही राहुल गांधी यांनी सरकारच्या या नव्या धोरणाचा निषेध केला आहे. इंटरनेट विश्वात कोणा एकाचे वर्चस्व नसून ते सर्वसमावेशक असावे अशी मागणी सध्या होत आहे. विविध प्रकारच्या आयडीया, क्रीएटीव्ह, कार्टून्स आणि फोटोजच्या माध्यमातून नेटीझन्स नेट न्युट्रॅलिटीची मागणी करत आहेत. यामध्ये आयआयटी खरगपूर आणि आयएसएम धनाबादच्या स्टूडंट्सने स्वतःचे मत मांडणारे फलक घेऊन नेट न्युट्रॅलिटीची मागणी केली आहे.
काय आहे नेट न्यूट्रॅलिटी?
इंटरनेटवर कोणतेही अॅप्लिकेशन तुम्ही वापरत असाल तर त्यासाठी लागणारा इंटरनेटचा वेग हा समसमान हवा. उदाहरणच द्यायचे झाल्यास आपण वीज विकत घेतो तेव्हा ती विज आपण फॅन, फ्रीज, टीव्ही अथवा एसी अशा सर्वच उपकरणाला समप्रमाणात वीज मिळते. इंटरनेटचे ही तसेच व्हायला हवे. मग तुम्ही ब्राऊझिंग करा किंवा व्हिडीओ पाहा अथवा गाणे ऐका. या सर्वांना इंटरनेटचा स्पीड सारखाच मिळायला हवा. इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात येणारी कोणतीही सेवा अथवा सुविधा असो त्यासाठी तुम्हाला इंटरनेटकडून समानच वागणून मिळाली पाहिजे. यालाच नेट न्यूट्रॅलिटी असे म्हणतात.
फोटो - वरील सर्व फोटो The Logical Indian या फेसबुक पेजवरून घेण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, इंटरनेटवर नेटीझन्सने अशा प्रकारे केली नेट न्युट्रॅलिटीची मागणी. ..