आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने घेतला अझहरचा बदला, चीनचा दहशतवादी, बलूच नेत्याला दिला व्हिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/बीजिंग - संयुक्त राष्ट्रामध्ये जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला दहशतवादी जाहीर करण्यात चीनने अडसर आणला होता. आता भारताने वर्ल्ड उइगर काँग्रेसचा (डब्ल्यूयूसी) प्रमुख डोल्कन इसाला व्हिसा दिला आहे. वास्तविक चीनच्या दृष्टीने इसा हा दहशतवादी आहे.
चिनी वंशाचे इसा भारतातील धर्मशालामध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या एका संमेलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. संमेलनाचे आयोजन अमेरिकेतील संघटना इनिशिएटिव्ह फॉर चायना यांच्याकडून करण्यात आले आहे. संमेलनात चीनमधील लोकशाही पातळीवरील परिवर्तनावर चर्चा होईल. इसावर शिजियांगमध्ये वाढत्या दहशतवादाचा ठपका आहे. त्यास व्हिसा देण्याच्या भारताच्या निर्णयावर चीन भडकले आहे. इसा दहशतवादी आहे. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्याला पकडण्याची सगळ्याच देशांची जबाबदारी आहे. इसाला जर्मनीने आश्रय दिला आहे. इसाला व्हिसा देण्याच्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, आम्ही मीडियातील बातम्या पाहिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय पडताळणी करत आहे.
सागरी प्रकल्प
दक्षिण चीन सागरात चीनने अण्वस्त्र ऊर्जा प्लॅटफॉर्मची तयारी सुरू केली आहे. एका चिनी वृत्तपत्राने हा दावा केला आहे. चीनच्या अनेक प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. परंतु चिनी परराष्ट्र मंत्रालयाने मात्र त्यावर काहीही माहिती नसल्याचा दावा केला.
सीमावाद सोडवणार
चीनने पहिल्यांदा भारतासोबत सीमावाद सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत ही सहमती झाली. त्यासाठी अशा प्रकारचा करार केला पाहिजे, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले.
धर्मशाला येथील कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी
-हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी ईसा भारतात येणार आहे.
- बौद्ध धर्मगुरु दलाई लामा या परिषदेला संबोधित करणार आहेत. यावेळी उईगर नेता ईसा आणि दलाई लामा यांची भेट होण्याची शक्यता आहे.
- चीनने वर्ल्ड उइगर काँग्रेस (WUC) नेते डोल्कन ईसाला जर्मनीतील भारतीय दुतावासाकडून व्हिसा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चीनने म्हटले आहे, की ईसा दहशतवादी आहे.
- इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे सर्व देशांची त्याला पकडण्याची जबाबदारी आहे.
- अशीही चर्चा आहे, की चीनने यूएनमध्ये मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्याला विरोध केला होता, त्याचा बदला म्हणून आता भारताने ईसाला व्हिसा दिला आहे.
- धर्मशाला येथे आयोजित कॉन्फरन्स अमेरिकेच्या 'सिटिझन पॉवर फॉर चायना'च्या वतीने आयोजित केली आहे. त्याचे प्रमुख यांग जियानली हे 1989 मध्ये थियामेन स्क्वेअर येथे झालेल्या आंदोलनात सहभागी होते.
- दरम्यान, डोल्कन ईसाच्या व्हिसाबद्दल विचारल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, 'आम्ही या संदर्भातील बातम्या पाहिल्या आहेत, सत्यता काय आहे याची माहिती घेत आहोत.'

उइगर नेत्यावर शिंजियांगमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा आरोप
- चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते हुआ शुनयिंग यांनी मीडियाला सांगितले, की डोल्कन ईसा चीनी पोलिसांच्या नजरेत एक दहशतवादी आहे. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
- हुआ यांना जेव्हा पत्रकारांनी छेडले की ईसा सह WUC चे इतर नेते याच महिन्यात भारतात दलाई लामांची भेट घेणार आहेत, भारतानेही तशी परवानगी दिली आहे. त्यावर हुआ यांनी याबाबत माहिती नसल्याचे म्हटले.

कोण आहे डोल्कन ईसा
- म्यूनिखचा रहिवाशी डोल्कन ईसाला 1990 मध्ये जर्मनीने आश्रय दिला होता.
- ईसा वर्ल्ड उईगर काँग्रेसचा नेता आहे. ईसाचे म्हणणे आहे, 'भारताने त्याला इलेक्ट्रॉनिक व्हिसा दिला आहे आणि तो त्याच्या पहिल्या भारत भेटीची अतुरतेने वाट पाहात आहे.'
- WUC ही चीनच्या बाहेर राहाणाऱ्या उइगर समजाची संघटना आहे.
- ईसावर चीनच्या शिंजियांग प्रोव्हिन्स येथे दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा आणि हत्येचे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे.
- 1997 पासून ईसा इंटरपोलच्या यादीत आहे.

चीनमध्ये किती आहेत उइगर मुस्लिम
- चीनच्या शिंजियांग मध्ये उगर मुस्लिमांची लोकसंख्या एक कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांना तुर्की वंशांचे मुस्लिम मानले जाते.
- चीनचे म्हणणे आहे, की उइगर नेते मुस्लिम बहुल शिंजियांगमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये,
>> कोण आहेत नीला कादरी
>> पाकिस्तानच्या ISI बद्दल काय आहे नीला यांचे मत