आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India America Relationship And Agreement News In Marathi

अणुकरार: भारत झुकला नाही; अमेरिकेचेही समाधान, 7 वर्षांनंतर निघाला तोडगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि अमेरिका यांच्यात सात वर्षांपासून प्रलंबित नागरी अणुकरारावर सहमती झाली आहे. भारताला झुकावे लागले नाही आणि अमेरिकेचेही समाधान झाले, हे त्यातील सर्वांत मोठे यश आहे.
संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवणे आणि भारतीय संरक्षण उद्योगांचे आधुनिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान हस्तांतरणावरही सहमती झाली. अणुकराराचा मुद्दा महत्त्वाचा होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर ‘चाय पे चर्चा’ झाली. त्याच वेळी अणुकरारावर मार्ग निघाला. प्रतिनिधी मंडळ स्तरावरील तीन तास चर्चेनंतर पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, ‘नागरी अणुकरार हा मुख्य मुद्दा होता. तो झाल्याने दोन्ही देशांत विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्या आर्थिक संधीही उपलब्ध होतील.’ ओबामा म्हणाले, ‘आम्ही दोन मुद्द्यांवर यश मिळवले आहे. त्यामुळे नागरी अणुसहकार्य वाढेल. आम्ही सोबत काम करतानाच आपले नाते कसे मजबूत करू शकतो हे दर्शवणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.’
पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रोटोकॉल मोडत मोदींनी घेतली ओबामांची गळाभेट...