आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा चीन दौरा : सीमा वाद सुटल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. मोदींच्या या दौऱ्याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. दोन्ही देशांचे या दौऱ्यासाठीचे आपले स्वतंत्र असे अजेंडे आहेत. त्यात या दौऱ्यादरम्यान कसे चित्र समोर येते हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
सीमा वादामुळे दोन्ही देशांमध्ये वेळो वेळी तणावाचे वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे जर या मुद्यावर दोघांमध्ये काही चांगली चर्चा किंवा एकमत झाले तर त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो. मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या चर्चेचील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकुयात...

मोदींचे प्राधान्य...
- शांतता आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) वर स्थैर्य, चीवकडून वारंवार होणारी घुसखोरी
- सीमावाद सोडवण्यासाठी रोडमॅप तयाप करावा
- दोन्ही देशांदरम्यान आर्थिक संबंध अधिक मजबूत व्हावे. चीनने भारतात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मदत करावी.
- मोदींची 'मेक इन इंडिया’ योजना यशस्वी होण्यासाठी मदत करावी.
- दोन्ही देशांमध्ये व्यापारी क्षेत्रात संतुलन असावे.

जिनपिंग यांची नजर
- सीमा वाद सुटावा
- भारतात गुंतवणुकीसाठी चीनसाठीच्या नियमांत सूट दिली जावी.
- न्यू सिल्क रूटमध्ये भारताने भागीदारी करावी.
- चीनच्या विरोधात अमेरिकेच्या रणनितीपासून भारताने दूर राहावे.
- चीन नेतृत्व करत असलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारतानेही सहभागी व्हावे. त्यात ब्रिक्स बँकेचाही समावेश आहे.