आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India & Nepal Sign Nine Agreements For Partnership And Progress

भारत-नेपाळमध्‍ये नऊ करार, ओली म्‍हणाले- मतभेद दूर करण्‍यासाठी आलोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली शुक्रवारपासून सहा दिवसांच्‍या भारत दौऱ्यावर आलेत. त्‍यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासोबत चर्चा केली. यामध्‍ये अनेक महत्‍त्‍वाच्‍या मुद्यावर चर्चा होऊन नऊ करार झाले. यात रस्‍ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजांसाठी भारताने नेपाळला मदत करण्‍याचे ठरले. वर्ष 2011 नंतर पहिल्‍यांदाच नेपाळच्‍या पंतप्रधानांनी भारत दौरा केला. या भेटीमधून मागील सहा महिन्‍यांत दोन्‍ही देशांत झालेले मतभेद दूर करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. शर्मा यांच्‍यासोबत नेपाळचे विरोधी पक्ष नेताही आहेत.
भारत-नेपाळमध्‍ये झालेले नऊ करार
- भारत आणि नेपाळ यांच्‍यात शनिवारी एकूण नऊ करार झाले.
- दोन्‍ही देशांमध्‍ये वाहतूक कॉरीडॉर आणि महामार्ग बनवले जाणार आहेत.
- पुढील दोन वर्षांत भारत नेपाळला 80 मेगावाट वीज देणार आहे.
- भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांना आपल्‍या भूमिचा वापर करू दिला जाणार असे आश्‍वासन नेपाळने दिले.
- कला आणि सांस्‍कृतिक क्षेत्राशी निगडित करार झाले.
- पंतप्रधान मोदी आणि ओली यांनी मुज्जफरपूर-ढालकेबार पॉवर ट्रांसमिशन लाइनची कळ दाबून चर्चेला सुरुवात केली.
- भेटी नंतर दोन्‍ही देशांच्‍या पंतप्रधानांनी संयुक्‍तरीत्‍या स्टेटमेंट दिले.
नेपाळमध्‍ये शांती आणि स्‍थ‍िरता टिकवणे हाच उद्देश- मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या भाषणात नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोइराला यांना श्रद्धांजली.
- ते म्‍हणाले, "भारताचा आर्थिक विकास नेपाळसाठी महत्‍त्‍वाचा आहे. "
- "या काही वर्षांत नेपाळने लोकशाही प्रकरणात खूप यश प्राप्‍त केले आहे."
- "नेपाळमध्‍ये शांती प्रस्‍थापित होऊन तिथे विकास व्‍हावा, यासाठी आमचे प्रयत्‍न असतील.
21 मधेसींना ताब्‍यात घेतले.
- नेपाळच्‍या पंतप्रधान दौऱ्याला विरोध करणारे 21 मधेसी लोकांना ताब्‍यात घेतले
- हे आंदोलक नरेंद्र मोदी यांच्‍या बंगल्‍याकडे जाण्‍याचा प्रयत्‍न करत होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, 2011 नंतर पहिल्‍यांदाच नेपाळी पंतप्रधानांचा दौरा..