आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे आणि कशी आहे भारत-पाक सीमा, दहशतवादी अशी करतात घुसखोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रविवारी (18 सप्टेंबर) पहाटे पाचच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील उरी येथे दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या चार दहशतवाद्याने बेछूट गोळीबार करून लष्कराच्या छावणीवर ग्रेनेड हल्ला केला. जवानांच्या तंबूत आग पसरली. यात 18 जवानांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान यापूर्वी दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्‍या तळावर हल्‍ला केला होता.

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी भारतात कसे घुसले? त्‍यांनी शस्‍त्र कशी आणली? असे अनेक प्रश्‍न उपस्‍थ‍ित झाले आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com या विशेष वृत्‍तमालिकेतून भारत- पाकच्‍या आंतरराष्‍ट्रीय सीमेविषयी माहिती देत आहे.

भारताच्या या राज्‍यांंना लागून आहे पाकची सीमा
पंजाब, गुजरात, राजस्‍थान आणि काश्मिर या राज्‍यांना लागूनच पाकिस्‍तानची सीमा आहे. दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसघोरी करतात. याशिवाय पाकिस्‍तातून समुद्रीमार्गे थेट मुंबईत घुसखोरी करण्या इतपत दहशतवादीची मजल गेली आहे.

नेमका कुठे आहे पाकिस्‍तान?
भारताच्या वायव्य देशाला पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या पूर्वेला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नैऋत्येला इराण, ईशान्येला चीन आहे. पाकिस्तानच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्याला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्र आणि ओमानचे आखात असून देशाला 1046 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

असे आहे भारत पाक सीमेचे क्षेत्रफळ
जम्‍मू-काश्मीर - 1225 किमी
पंजाब - 553 किमी
राजस्‍थान - 1037 किमी
गुजरात - 508 किमी
एकूण - 3323 किमी


पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, भारत-पाकिस्‍तानच्या सीमेविषयी...
बातम्या आणखी आहेत...