आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India And Pakistan Series Will Happen Tentatively From Dec 15 Says Rajiv Shukla

राजीव शुक्लांचा दावा -15 डिसेंबरपासून श्रीलंकेत होऊ शकते भारत-पाक मालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान दरम्यानची क्रिकेट मालिका येत्या 15 डिसेंबरपासून श्रीलंकेत सुरु होण्याची शक्यता आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी व्यक्त केली आहे. याची अधिकृत घोषणा 27 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतासोबत खेळण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला याआधीच मंजूरी दिली आहे. तर, बीसीसीआयनेही सरकारला पत्र लिहिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही देश श्रीलंकेत क्रिकेट खेळू शकतात. यात पाच एक दिवसीय सामने आणि दोन टी-20 सामन्यांचा समावेश असू शकतो. हवामानाचा विचार करता सामने श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडीमध्‍ये होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी क्रिकेट मालिका युएईमध्‍ये होणार होती. मात्र फिक्सिंगच्या शंकेमुळे भारताने येथे खेळायला नकार दिला. यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानला भारतात खेळण्‍याचे आमंत्रण दिले होते. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे पीसीबीने भारतात येऊन मालिक खेळायला नकार दिला होता.

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होऊ शकते मालिका
भारत आणि पाकिस्तानमधील मालिका यंदा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. तर पुढील वर्षी कसोटी मालिक इंग्लंडमध्ये खेळवण्यासंबंधी विचार सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दुबईमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याद दोन्ही मालिकांवर एकमत झाले आहे. आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

मालिकेसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले - अनुराग ठाकूर
पाकिस्तानसोबतची क्रिकेट मालिक श्रीलंकेत खेळवण्यासंबंधी केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात आले आहे. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, बोर्डाने परराष्ट्र मंत्रालयाकडे पाकिस्तानसोबत मालिका खेळण्याची परवानगी मागितली आहे.

पाकिस्तानात खेळण्यास कोणत्याही देशाचा नकार
>> 2009 मध्ये लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमबाहेर श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता.
>> यानंतर जगातील कोणत्याही मोठ्या देशाने पाकिस्तानात क्रिकेट दौरा करण्यास नकार दिला.

2012 मध्ये दोन्ही देशात झाली होती शेवटची मालिका
भारत-पाकिस्तान दरम्यान 2012 मध्ये मालिका खेळली गेली होती. 2012 मध्ये पाकिस्तान संघ भारतात आला होता. त्यावेळी फक्त तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. तेव्हापासून दोन्ही संघ विश्वचषक 2015 आणि आशिया चषक यासारख्या आयसीसी वनडे मध्येच खेळले आहे.