आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-रशिया संयुक्तरीत्या बनवणार पाचव्या पिढीचे लढाऊ विमान; करारावर स्वाक्षऱ्या लवकरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007 मध्ये भारत आणि रशियाने FGFA प्रोजेक्टच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तरीही दोन्ही देशांमध्ये हा करार लटकला होता. - Divya Marathi
2007 मध्ये भारत आणि रशियाने FGFA प्रोजेक्टच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तरीही दोन्ही देशांमध्ये हा करार लटकला होता.
नवी दिल्ली - भारत आणि रशिया एकत्रितरीत्या 5th जनरेशन फायटर एयरक्राफ्ट (एफजीएफए) विकसित करणार आहेत. यासाठी दोन्ही देशांमध्ये लवकरच करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. दोन्ही देशांत 2007 मध्ये हा करार झाला होता. मात्र, विविध कारणांमुळे त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही. रॉस्टेक स्टेट कॉरपोरेशनचे सीईओ सेरजी शेमेजोव्ह यांनी सांगितल्याप्रमाणे, लवकरच भारत आणि रशिया अब्जावधी डॉलरच्या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. यासाठी प्रक्रियेला आता वेग आला आहे. 

 
याच वर्षी होणार स्वाक्षऱ्या
- मे 2017 मध्ये आलेल्या वृत्तानुसार, "FGFA जेट डिझाईन आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर जमीनी स्तरावरील काम पूर्ण झाला आहे. जेणेकरून कराराला अंतिम स्वरूप देता येणे शक्य होईल."
- भारत आणि रशिया कराराशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, "डिटेल डिझाइनसाठी करार लवकरच होणार आहे. हा करार भारतासाठी मोठे यश ठरणार आहे. तसेच याच वर्षी करार होईल अशी अपेक्षा आहे."
- शेमेजोव्ह यांनी रशियाच्या प्रीमियर एयर शो MAKS 2017 च्या निमित्ताने सांगितले, की करारावरील प्रक्रियेवर सध्या काम सुरू आहे. ही प्रक्रिय क्लिष्ट असल्यामुळेच वेळ लागला. 

 
तंत्रज्ञानावर दोन्ही देशांचा हक्क
वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, "दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नातून FGFA तयार केला जात आहे. यासंबंधित तंत्रज्ञानावर दोन्ही देशांचा हक्क राहणार आहे."

 
संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
संरक्षण मंत्रालयाने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच या कराराला मंजुरी दिली आहे. यानंतरच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी करारावर नव्याने चर्चा सुरू केली. तेव्हापासून बजेट, कमिटमेंट, वर्कशेयर, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) आणि टेक्नोलॉजी ट्रांसफर इत्यादी मुद्यांवर असलेल्या समस्या दूर करण्यात आल्या आहेत. 

 
2007 मध्येही झाल्या होत्या स्वाक्षऱ्या
2007 मध्ये भारत आणि रशियाने FGFA प्रोजेक्टच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. डिसेंबर 2010 मध्ये भारताने 29.5 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात 1900 कोटी रुपयांच्या प्राथमिक डिझाईनसाठी देण्याचे आश्वस्त केले होते. तरीही दोन्ही देशांमध्ये हा करार लटकला होता.
बातम्या आणखी आहेत...