आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्ताईला ऊर्जितावस्था, ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रघुराम राजन यांचा कार्यकाळ चार सप्टेंबर रोजी संपणार आहे, त्यानंतर पटेल पदभार सांभाळतील. ऊर्जित पटेल ११ जानेवारी २०१३ पासून रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. यंदा जानेवारीत त्यांना मुदतवाढ मिळाली होती.

सध्या त्यांच्याकडे महागाई धोरण विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. याशिवाय ते आर्थिक धोरण संशोधन, सांख्यिकी, ठेवी विमा याचेही काम पाहतात. डेप्युटी गव्हर्नर पदावरुन गव्हर्नर होणारे ते आठवे व्यक्ती आहेत. राजन यांचा महागाईशी लढणारा योद्धा म्हणून ऊर्जित पटेल यांची ओळख आहे. पटेल गव्हर्नरपदी आल्यानंतर स्वस्ताईचा काळ येईल अशी अपेक्षा आहे. ऊर्जित पटेल विख्यात अर्थतज्ज्ञ आहेत. रिझर्व्ह बँकेत येण्यापूर्वी ते बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये सल्लागार होते. ते १९९० ते १९९५ या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये होते. आयएमएएफ मध्ये त्यांच्याकडे भारताशिवाय अमेरिका, म्यानमार आणि बहामासची जबाबदारी होती. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी रिझर्व्ह बँकेत डेप्युटेशनवर काम केले. तेव्हा कर्ज बाजार, बँकिंग सुधारणा, पेन्शन फंड सुधारणाचे ते सल्लागार होते. ते १९९८ ते २००१ या काळात वित्त मंत्रालयात सल्लागार होते. त्यानंतर २००० ते २००४ या काळात त्यांनी अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्यपद भूषवले. यात प्रत्यक्ष कर, पायाभूत सुविधा, नागरी विमानउड्डाण, राज्य वीज मंडळ आणि भविष्य निर्वाह निधी संबंधी समित्यांचाही समावेश आहे.

ऊर्जित पटेल : महागाई समिती ते गव्हर्नर
यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेच २०१४ मध्ये किरकोळ महागाई दरावर भर देण्याचे सांगितले होते. त्यापूर्वी घाऊक महागाईवर धोरण आखले जायचे.

- राजन यांनी महागाईविरुद्ध जे निर्णय घेतले ते ऊर्जित यांच्या समितीच्याच शिफारशींनुसार ...
- ऊर्जित यांना यूपीए सरकारने डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले. ते चिदंबरम यांचे निकटवर्तीय आहेत.
- राजन यांना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जाहीर विरोध केला होता. राजन यांची विदेशी मानसिकता, उद्योगांची सोडून महागाईचीच चिंता व यूपीएशी जवळीक या मुद्द्यांवरून हा विरोध होता.
- ऊर्जित यांचा तर जन्म केनियात झाला.लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बीए, ऑक्सफोर्डमधून एम.फिल व येल विद्यापीठातून १९९० मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळवली. एकूण ते विदेशातच शिकले.

याच प्रमुख मुद्द्यांमुळे ऊर्जित पटेल यांच्या नावावर झाले एकमत
१. राजन यांनीच केली होती पहिली शिफारस : सर्वांत अगोदर रघुराम राजन यांनीच ऊर्जित पटेल यांचे नाव सुचवले होते. तीन वर्षांत आरबीआयने जे काही चांगले कार्य केले त्यात पटेल यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे राजन यांचे म्हणणे होते.
२. कायम आघाडीवर ठेवले : आरबीआयच्या सर्वांत महत्त्वाच्या मॉनिटरी पॉलिसी विभागाचे ऊर्जित प्रमुख होते. या दरम्यान राजन यांनी प्रत्येक वेळी त्यांना संधी दिली व आघाडीवर ठेवले.
३. नोकरशहाची पार्श्वभूमी नाही : आरबीआयमध्ये ५ डेप्युटी गव्हर्नर असतात. यात एक अर्थतज्ज्ञ असतो. ही व्यक्ती नोकरशाहीतून आलेली नसते. पटेल याच कॅटेगरीतून होते. याचा लाभ आरबीआयला आगामी काळात होईल.
बातम्या आणखी आहेत...