आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Become Polio Free Nation, Annonucement Possible In New Year

भारत होणार पोलिओमुक्त; नव्या वर्षात घोषणा शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - देशभरात 13 जानेवारी 2014पर्यंत पोलिओ व्हायरस आढळला नाही, तर जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारताला पोलिओमुक्त देश ठरल्याचे प्रमाणपत्र मिळेल. राष्‍ट्रीय स्तरावरील आठ प्रयोगशाळांमध्ये पोलिओचे विषाणू नष्ट करण्यात येत आहेत.
सर्व सरकारी, खासगी मेडिकल कॉलेज, प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांकडून त्यांच्याकडे विषाणू संरक्षित नसल्याचे लिहून घेतले जात आहे. आतापर्यंत 200 संस्थांकडून अशा आशयाचे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. डब्ल्यूएचओकडून या प्रयोगशाळांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तीन वर्षांपर्यंत पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही, तर त्या देशाला पोलिओमुक्त ठरवले जाते, असे उदयपूरचे कलेक्टर आशुतोष ए.टी. यांनी म्हटले आहे. देशात 13 जानेवारी 2011 रोजी बंगालमध्ये पोलिओचा रुग्ण आढळला होता.
त्यानंतर आतापर्यंत एकही केस आढळलेली नाही. डब्ल्यूएचओतर्फे देशात नॅशनल पोलिओ सर्व्हिलान्स प्रोजेक्टही राबवला जात आहे. त्यावर देशात आजवर 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशातील प्रयोगशाळा व इतर संस्थांमध्ये असलेले पोलिओ व्हायरस नष्ट करण्यात येत असल्याचे एनपीएसपीचे मेडिकल आॅफिसर डॉ. ज्ञान प्रकाश यांनी सांगितले. भारतासोबतच अनेक देश अद्याप पोलिओमुक्त नाहीत. पाकिस्तान, अफगाणिस्तान व नायजेरियातही पोलिओ व्हायरस आढळलेले आहेत.