आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत 5 वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी पाशवी बलात्कार केला. त्यांनी केलेले कृत्य विकृतीच आहे. परंतु, अशी विकृती फोफावते कशी, हा मोठा विषय आहे. दोघांनी दारुच्या नशेत पॉर्न चित्रपट पाहिला आणि त्यांची वासना भडकली. पॉर्न फोटो आणि चित्रपट पाहुन भावना चाळविल्या जातात. त्यातून कोणत्याही प्रकारे वासना शांत करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. अशा स्थितीत माणसाला कशाचेही भान राहत नाही. बलात्काराच्या घटनेच्या विरोधात निदर्शने झाल्यानंतर सरकार आता पॉर्न साईट्सवर बंदी घालण्याच्या पावित्र्यात आले आहे. एका सर्वेक्षणानुसार देशात 60 टक्के लोक पॉर्नशी संबंधित माहिती आणि कंटेंट डाऊनलोड करतात. तर इंटरनेटवर उपलब्ध असलेला 56 टक्के कंटेंट कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अश्लिल आहे. त्यामुळे सरकार पॉर्न कंटेंटवर बंदी घालण्यात कितपत यशस्वी ठरेल, हा मोठा प्रश्न आहे.
या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यापूर्वी एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतात पॉर्नची पाळेमुळे कशी पसरली आणि इंटरनेटचा वापर करणारे पॉर्नच्या आहारी कसे गेले, याची माहिती काढली. गुगलच्या काही टुल्सच्या माध्यमातून मिळालेली माहिती चकीत करणारी आहे.
गुगलने 2004 पासून सर्चबाबत आकडेवारी देणे सुरु केले. त्यानुसार 2004 ते 2010 या कालावधीत भारत सर्वाधिक पॉर्न सर्च करणा-या देशांमध्ये कधीही नव्हता. परंतु, 2011 मध्ये भारत या यादीत 9 व्या स्थानी आला. तर 2012 मध्ये भारत 5 व्या स्थानावर आला. तर गेल्या 12 महिन्यांपासून 4 थ्या स्थानावर आहे. पाकिस्तान, त्रिनिदाद व टोबॅगो, पापुआ न्यू गिनी हे देश भारताच्या पुढे आहेत.
'सेक्स' या शब्दाचा आधार घेऊन सर्च करण्यातही हीच परिस्थिती आहे. सप्टेंबर 2011 पासून याबाबतीत सर्च करण्याचे प्रामण भारतात झपाट्याने वाढले.
2011 मध्ये असे काय घडले, ज्यामुळे भारतात पॉर्नचा प्रसार एखाद्या रोगाप्रमाणे पसरला? यामागे कारणीभूत आहे एक पॉर्नस्टार. भारतीय वंशाची ही पॉर्नस्टार प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागली. या स्टारचे नाव आहे. सनी लियोन. 'बिग बॉस' या रियालिटी शोमध्ये ती झळकली आणि तिथून भारतीय माध्यमांच्या मुख्य प्रवाहात तिचे नाव चर्चिलया जाऊ लागले. हळूहळू तिने इंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये घट्टपणे पाय रोवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.