आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Best Photographer Shows Father And Daughter Relation

हे आहेत सेलेब्स आणि त्यांच्या मुलींचे बेस्ट PHOTOS, यासाठी तयार होत आहे कॉफी टेबल बुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश भट्ट आणि आलिया. आलिया बॉलिवूडमधील सर्वात यंग अॅक्ट्रेस आहे. - Divya Marathi
महेश भट्ट आणि आलिया. आलिया बॉलिवूडमधील सर्वात यंग अॅक्ट्रेस आहे.
नवी दिल्ली/मुंबई - कपिल देव, जावेद अख्तर, महेश भट्‌ट, नीरव मोदी, सदगुरु, सारख्या दिग्गजांमध्ये कोणती बाब कॉमन आहे ? सहाजिक आहे तुम्हाला वाटेल हे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात शिखरावर आहेत, मात्र यांच्यातील समान धागा आहे हे सर्वजण मुलींचे पिता आहेत. यासारख्या देशातील 125 सेलिब्रिटीजचे त्यांच्या मुलींसोबतचे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर्सने क्लिक केले आहे. याचा उद्देशही मोठा आहे. या फोटोजच्या मालिकेची कॉफी टेबल बुक तयार होणार आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे.
कोणी घेतला पुढाकार...
- महिला सशक्तीकरणासाठी काम करणारी दिल्लीतील एनजीओ 'खुशी'ने यासाठी पुढाकार घेतला आहे.
- वडिल आणि मुलगी यांच्यातील भावनिक नात्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा हा प्रयत्न आहे.
- याचे शिर्षक आहे 'टाइमलेस पोर्टेट्स ऑफ लव्ह'.
- एनजीओने भारताला क्रिकेटमधील पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देवपासून या फोटो मालिकेची सुरुवात केली.
- त्यानंतर देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलेब्सना आणि त्यांच्या मुलींना या सामाजिक उपक्रमासाठी सहभागी करुन घेण्यात आले.

देशातील बेस्ट फोटोग्राफर्सने दाखवली कमाल
- डब्बू रतनानी, जतिन कंपानी आणि अमित पसरीचा यांसारख्या देशातील बेस्ट फोटोग्राफर्सने देखिल या स्तुत्य उपक्रमात आपल्या कॅमेराची कमाल दाखविली आहे.
- कपिल देव म्हणाले, 'हे युनिक इनेशेटिव्ह आहे. याद्वारे त्या क्षणांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जे आयुष्यभर केव्हाही पाहात राहावे वाटत राहातील आणि कायम आनंद देतील.'
- या पुस्तकातील प्रत्येक पानावर मुलींसाठी पित्याचे प्रेम वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला आणि वाचायला मिळेल.

प्रत्येक फोटोत वेगळे बंधन
- प्रत्येक फोटोत पिता आणि पुत्रीच्या नात्याची वेगळी विण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे ज्यांना मुली आहेत त्या वडिलांना आपल्या मुली ओझे न वाटता त्यांनी त्यांच्या पालन पोषणात कोणतीही कमतरता करु नये असा उद्दात्त हेतू आहे.
- त्यासोबतच मुलींनाही हे कॉफी टेबल बुक वेगळा आनंद देईल. जेव्हा त्या या पुस्तकाची पाने चाळतील तेव्हा त्यांना त्यांच्या मुलगी असण्याचा अभिमान वाटेल.
- खुशी या एनजीओ द्वारे गरजू मुलींच्या शिक्षण आणि लिंग भेदभाव कमी करण्यासाठी काम केले जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये अल्बमसाठी शुट झालेल्या फोटोतून पाहा, बाप-बेटीचे नाते कसे झाले क्लिक...