आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Buy Areaplane From America For Estimation Of Natural Disaster

नैसर्गिक संकटाचा अचूक अंदाज बांधण्‍यासाठी भारत नासाकडून खरेदी करणार विमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नैसर्गिक संकटाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी भारत नासाकडून एक विमान खरेदी करणार आहे. हे विमान म्हणजे एक प्रकारची संपूर्ण प्रयोगशाळाच आहे. या विमानाचे नाव डग्लस डीसी-8 आहे. येत्या दोन वर्षात विमान भारताला मिळेल. विज्ञान मंत्रालयाचे सचिव शैलेश नाईक म्हणाले की, देशात, विशेषकरून बंगालच्या खाडीत हवामानाच्या संशोधनासाठी सरकारने अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स विद्यापीठाशी करार केला आहे. चक्रीवादळाच्या अचूक अंदाजासाठी या प्रयोगशाळेचा उपयोग होईल. प्रयोगशाळेवर जवळपास 940 कोटी रुपये खर्च येईल.
या क्षेत्रात उपयोग : ऑर्किओलॉजी, इकोलॉजी, जिओग्राफी, हायड्रोलॉजी, मेटिरिओलॉजी, ओशेनोग्राफी, व्होल्कॅनोलॉजी, अ‍ॅटमॉसल्फियरिक केमिस्ट्री, सॉइल सायन्स आणि बायोलॉजी.
04 इंजिन असतील विमानात
157 फूट लांब असेल
148 फूट विंगस्पॅन
42 हजार फुटांपर्यंत उड्डाण करेल
12 तास सलग उड्डाणास सक्षम
2015-16 पर्यंत मिळण्याची आशा
या पद्धतीने उपयोग करत आहे नासा
सेन्सर डेव्हलपमेंट
हा उपग्रह पाठवण्यास खर्च कमी येतो, त्यामुळे प्रोटोटाइप सॅटेलाइटची उपकरणे यातून पाठवून त्याच्या चाचण्या घेता येऊ शकतील.
सीओ 2 सेन्सिंग
दिवस आणि रात्री, वेगवेगळ्या वातावरणात हा देश किंवा शहराच्या वरती हवेतील, पाण्यात आणि जमिनीतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण मोजेल.
अवकाश स्थानक
याच्या सहाय्याने शास्त्रज्ञ उपग्रहांकडून संदेश प्राप्त करू शकतात आणि ते पाठवू शकतात. एक प्रकारे ते अवकाश स्थानकाचे काम करेल.
45 शास्त्रज्ञ बसू शकतात
14 हजार किलोची शास्त्रीय उपकरणे वाहून नेता येऊ शकतील.
पावसाचाही अचूक अंदाज
हवेची दिशा समजण्यात विमानाची मदत मिळेल. विविध उंचींवर हवेची गती, दिशा ओळखून हवामानाची माहिती देईल. चक्रीवादळे, वादळे, सागरी वादळ, पावसाची अचूक माहिती देईल. हिमनद्या वितळण्याची माहितीही देऊ शकतो.